Suniel Shetty Angry: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम वडीलसुद्धा आहे. सुनील शेट्टीनं अनेकदा दाखवून दिलंय की, तो त्याच्या कुटुंबासाठी संपूर्ण जगाशी लढू शकतो. जेव्हा-जेव्हा कुणी त्याच्या मुलांना विनाकारण ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय, तेव्हा तेव्हा सुनील शेट्टीनं मुलांवरच्या टीकेला परतवून लावलं आहे. त्याच्या कुटुंबाबाबत कुणीही काहीही वेडंवाकडं बोललं तर सुनील शेट्टी त्या व्यक्तीला अजिबात सोडत नाही. अलिकडेच सुनील शेट्टीनं त्याचा मुलगा अहान शेट्टीबद्दल सांगितलं. सुनील शेट्टी म्हणाला की, त्याचा मुलगा अहानला विनाकारण लक्ष्य केलं जातंय. इतकंच नाहीतर, अनेकांनी 'बॉर्डर 2' (Border 2) मधल्या अहानच्या कास्टिंगवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलाला ट्रोल करणाऱ्या सर्वांनाच सुनील शेट्टीनं खरं-खोटं सुनावलं आहे.
झुमला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीनं त्याचा मुलगा अहानबद्दल सांगितलं. त्यानं सांगितलं की, अहानची इमेज खराब करण्यासाठी नेगेटिव आर्टिकल पब्लिश करण्यात आले आहेत. काहींना अहानची इमेज खराब करायची होती. पण मी अहानला समजावलं की, त्यानं आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करावं. त्यानं फक्त आणि फक्त त्याचा आगामी सिनेमा 'बॉर्डर 2'वर लक्ष केंद्रीत करावं.
निगेटिव्ह पेड आर्टिकल पोस्ट
सुनील शेट्टी म्हणाले की, अहाननं या चित्रपटासाठी अनेक गोष्टी सोडल्या आहेत. त्याच्या अहंकारामुळे अनेक गोष्टी त्याच्या हाताबाहेर गेल्या आहेत. त्याला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं आणि त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. एवढंच नाही तर त्याच्याकडे महागडे बॉडीगार्ड्स असल्याचा आरोपही करण्यात आला.
सुनील शेट्टीला संताप अनावर
सुनील शेट्टी म्हणाले की, "जर पुढे हे सगळं वाढलं तर एक प्रेस कॉन्फरन्स ठेवणार आणि सर्वांना एक्सपोज करणार. ज्यांचा साधेपणाचा बुरखा फाडायचाय, तो मी फाडून टाकणार.
अहानला सुनील शेट्टींनी काय सल्ला दिलेला?
"मी अहानला एक गोष्ट समजावून सांगितली की, यानंतर कोणत्याही चित्रपटात काम कर किंवा नको करुस, पण या फिल्ममध्ये पूर्ण जीव ओतून काम कर, कारण हीच फिल्म तुला आयुष्य काढण्यासाठी मदत करेल. ही फिल्म फक्त तुलाच नाही, मलाही पुढची कित्येक वर्ष आयुष्य काढण्यासाठी मदत करेल. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला ही फिल्म आवर्जुन पाहिली जाईल.
'बॉर्डर 2' बाबत बोलायचं झालं तर, सध्या सिनेमा प्री प्रोडक्शन स्टेजमध्ये आहे. यामध्ये सनी देओल, अहान शेट्टीसोबत अनेक सिनेकलाकार झळकणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :