Anushka Shetty wedding buzz: साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘बाहुबली’सारख्या सुपरहिट चित्रपटातून जगभरात प्रसिद्धी मिळवलेल्या अनुष्काबद्दल आता मोठी चर्चा रंगली आहे.  44 वर्षांची झालेली ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.मात्र ती नेमकं कोणाशी लग्न करणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Continues below advertisement

बेंगळुरूच्या बिझनेसमनशी लग्नाची चर्चा

मंगळुरूमध्ये जन्मलेल्या अनुष्का शेट्टीने आपल्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आता आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, ती अरेंज मॅरेज करण्याचा विचार करत असून बेंगळुरूतील एका बिझनेसमनसोबत तिचं लग्न होऊ शकतं. दरम्यान, तिच्या होणाऱ्या पतीची ओळख अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या बातम्यांबाबत अधिकृत घोषणा होण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

कधीकाळी प्रभाससोबत जोडले गेलेले नाव

‘बाहुबली’ चित्रपटानंतर अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांचं नाव अनेकदा एकत्र जोडलं गेलं होतं. चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र दोघांनीही अनेक वेळा स्पष्ट केलं होतं की ते फक्त चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात प्रेमसंबंध नाहीत.

Continues below advertisement

आगामी प्रोजेक्ट्स कोणते?

दरम्यान, अनुष्का शेट्टी अजूनही सिनेसृष्टीत सक्रिय आहे. गेल्या काही काळात तिने स्वतःवर मेहनत घेत वजनही कमी केलं आहे. 44 व्या वर्षीही ती अॅक्शन चित्रपटांमध्ये काम करत आहे. 2025 मध्ये तिचा ‘घाटी’ हा अॅक्शन-ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला होता, मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. आता 2026 मध्ये ती ‘कथनर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत जयसुर्या प्रमुख भूमिकेत असणार आहे. सध्या या चित्रपटाशिवाय तिच्या इतर मोठ्या प्रोजेक्ट्सबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र लग्नाच्या चर्चेमुळे अनुष्का पुन्हा एकदा चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.