Goverment On LPG Cylinder Shortage : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (Union Ministry of Petroleum and Natural Gas) शनिवारी एक अधिसूचना जारी केलीय, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, 'ज्या ग्राहकांकडे पाईप नॅचरल गॅस (PNG) कनेक्शन आहे ते आता 'एलपीजी' म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस सिलेंडर (Gas Cylinder) मागवू शकणार नाहीत आणि ना नविन कनेक्शन घेऊ शकणार, नाही रिफिल करु शकणार आहेत. सोबतचज्यांच्याकडे दोन्ही कनेक्शन आहेत त्यांनी नंतरचे कनेक्शन परत करावे आणि कोणत्याही सार्वजनिक तेल कंपनीकडून किंवा त्यांच्या वितरकांकडून सिलेंडर रिफिल घेण्यापासून देखील दूर राहावे. असेदेखीलसांगण्यातआलंआहे.

Continues below advertisement

मध्य पूर्वेतील चालू संकटामुळे (Iran Israel War) जागतिक इंधन पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर जारी केलेली ही अधिसूचना एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेशात सुधारणा म्हणून आली आहे. सुधारित आदेश पीएनजी वापरकर्त्यांना नवीन घरगुती एलपीजी कनेक्शन घेण्यास देखील निर्बंधघालण्यातआलेआहे. "पाइपद्वारे नैसर्गिक गॅस कनेक्शन असलेल्या आणि घरगुती एलपीजी कनेक्शन असलेल्या कोणत्याही व्यक्तीला घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही सरकारी तेल कंपनीकडून किंवा त्यांच्या वितरकांकडून घरगुती एलपीजी सिलेंडरचे रिफिल घेता येणार नाही. अशा व्यक्तींना त्यांचे घरगुती एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे लागेल," असे त्यात म्हटले आहे.

India LPG Cylinder Shortage : भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी पीटीआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या एक्स हँडलवर अधिकृत अधिसूचनेची प्रत शेअर करण्याच्या काही तास आधी, भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी पुष्टी केली होती की भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नवी दिल्ली आणि तेहरानमधील दीर्घकालीन मैत्री आणि सामायिक हितसंबंधांचा उल्लेख करून त्यांनी कबूल केले की सुरुवातीला भारताशी संवाद साधण्यात समस्या होत्या, परंतु दोन्ही देश आता "एकमेकांना पाठिंबा देत आहेत. आम्ही काही जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे, परंतु सध्या किती हे आम्ही सांगू शकत नाही. मी भविष्यात या मुद्द्यावर पाठपुरावा करेल. इराण आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आणि समान हितसंबंध आहेत," असे त्यांनी एकाकार्यक्रमात बोलताना सांगितले आहे.

Strait of Hormuz : एलपीजी जहाजांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केले सुरक्षितपणे पार जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताला सध्या तेल वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग देण्यात येईल. त्यानंतर, दोन्ही जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार केली आणि भारताकडे जात आहेत. शुक्रवारी (१३ मार्च) इराणी राजदूत मोहम्मद फताली यांनी याबाबत संकेत दिले. India LPG Cylinder : 16-17 मार्च रोजी भारतात पोहोचतील जहाज बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे मुख्य सचिव राजेश कुमार सिन्हा यांच्या मते, "होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला पर्शियन आखातातील 24 भारतीय ध्वजधारी जहाजांपैकी शिवालिक आणि नंदा या दोन एलपीजी वाहकांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार केले आहे. दोन्ही जहाजे भारताकडे जात आहेत. त्यांनी सांगितले की दोन्ही जहाजे अंदाजे 92,700 मेट्रिक टन एलपीजी वाहून नेत आहेत. ते 16 आणि 17 मार्च रोजी मुंद्रा आणि कांडला बंदरांवर पोहोचतील."

 
 इतर महत्वाच्या बातम्या