Anushka Sharma : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. वेगवेगळ्या भूमिका अगदी सहजपणे साकारणारी अनुष्का सध्या मात्र एका कठिण भूमिकेसाठी तयारी करत आहे. अनुष्का ही सध्या तिच्या चकदा एक्सप्रेस (Chakda Xpress) या आगामी चित्रपटाच्या भूमिकेची तयारी करत आहे. या चित्रपटामध्ये ती  क्रिकेटर झूलन गोस्वामी (Jhulan Goswami)  यांची भूमिका साकारणार आहे. झूलन यांच्या आयुष्यावर या चित्रपटाचे कथानक आधारित असणार आहे. नुकताच या चित्रपटाची तयारी करतानाचा एक फोटो अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं हटके कॅप्शन दिलं आहे. 


अनुष्कानं क्रिकेटची प्रॅक्टिस करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जर मी लहानपणी क्रिकेट खेळले असते तर माझ्यावर अशी परिस्थिती ओढावली नसती.' चकदा एक्सप्रेम या चित्रपटासाठी क्रिकेटची प्रॅक्टिस करतानाचे फोटो आणि व्हिडीओ अनुष्का सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. 


 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्कानं मुलगी वामिकाला जन्म दिला. त्यानंतर काही वर्ष अनुष्का शर्मानं अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. पण चकदा एक्सप्रेस या चित्रपटामधून ती पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. 






अनुष्काच्या चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचे शूटिंग भारताबरोबरच यूकेमध्ये देखील होणार आहे. या चित्रपटाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच  क्लीन स्लेट फिल्मझ यांनी केली आहे. या प्रोडक्शन हाऊसने एनएच 10 आणि परी या चित्रपटांची देखील निर्मीती केली आहे. अनुष्कानं 2017 मध्ये क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. विराटसोबतचे रोमँटिक फोटो अनुष्का सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.


संबंधित बातम्या