Indi Pop Hits : सध्या कोरियन पॉप म्युझिक म्हणजेच K-POP म्युझिक सर्वाधिक प्रसिद्ध आहे. जगभरात के-पॉप म्युझिकचा वेगळा चाहता वर्ग आहे. पण, तुम्हाला हे मोहित आहे की, कोरियन पॉप म्युझिक प्रसिद्ध होण्याआधीच भारतात पॉप म्युझिक खूप प्रसिद्ध होतं. 90 ते 2000 च्या दशकात इंडियन पॉप गाण्यांची खूप चलती होती. या काळात इंडियन पॉप गाणी खूप जास्त प्रमाणाच प्रचलित होती. या काळात एक इंडियन पॉप बॉय बँड सुद्धा खूप प्रसिद्ध होता.


भारतातील पहिला पॉप बॉय बँड


सध्या बीटीएस हा जगभरातील अव्वल क्रमांकाचा पॉप बँड मानला जातो. पण, बीटीएस आणि के-पॉप कल्चर प्रसिद्ध होण्याआधी भारतात एक बॉय बँड खूप प्रसिद्ध होता. बदलत्या काळानुसार, पॉप कल्चर बदलत गेलं आता तर बॉलिवूडमध्येही पॉप गाण्यांना पसंती दिली जाते. पहिल्या पॉप बॉय बँडबद्दल जाणून घ्या.


अ बँड ऑफ बॉयज


2001 भारतात 'अ बँड ऑफ बॉयज' (A Band of Boys) या बँडने सुरुवात केली. पाच तरुणांनी मिळून तयार केलेला हा बँड. या बँडचं वैशिष्ट्य असं की छोट्या पडद्यावरील म्हणजेच टीव्हीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या तरुणांची पॉप म्युझिकची आवड जोपासण्यासाठी या बँडची सुरुवात केली होती. 'अ बँड ऑफ बॉयज'ने सुरुवातीच्या काळात अनेक सुपरहिट गाणी दिली. 


पाच तरुणांकडून बँडची सुरुवात


टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करणाऱ्या पाच तरुणांनी या बँडची सुरुवात केली. यामध्ये अनुपमा फेम सुधांशू पांडे (Sudhanshu Pandey) याचाही समावेश आहे. 'अ बँड ऑफ बॉयज' मध्ये करण ओबेरॉय (Karan Oberoi), सुधांशु पांडे (Sudhanshu Pandey) , शेरिन बर्गसे (Sherrin Varghese), आशा भोसले यांचा नातू चैतन्य भोसले (Chintoo Bhosle) आणि सिद्धार्थ हल्दीपुर (Siddharth Haldipur) यांचा समावेश होता.



पहिला सुपरहिट अल्बम


या बँडचा पहिला अल्बम 2002 साली आला. या अल्बमचं नाव होतं. 'ये भी वो भी', 'मेरी नींद उड़ गयी है', 'इश्क है इन्तजार करता बेकरार', 'चाहा तुझे है जहां से भी ज्यादा', 'आ भी जा आ भी जा' ही या अल्बममधली सुपरहिट गाणी आहेत.



 


2001 पासून 2006 पर्यंत बँडची क्रेझ


2000 च्या तरुणाईवर या इंडिपॉप गाण्यांची खूप क्रेझ होती. 2001 पासून 2006 पर्यंत हा बँड खूप प्रसिद्ध होता. सुधांशू पांडे, करण ओबेरॉय यांचा बँड ऑफ बॉईज काही गाण्यांमुळे इतका प्रसिद्ध झाला की कॉलेजच्या मुलांनी, त्यातून प्रेरित होऊन, स्वतःचे बँड बनवायला सुरुवात केली. त्याच्या गाण्यांमध्ये डान्सपासून फॅशन ते, मैत्री, प्रेम या भावना अशा सर्व गोष्टींचा समावेश होता, म्हणूनच त्या काळात लोक त्याच्या बँडशी खूप जोडले गेले.


'या' बँडचं शेवटचं गाणं


स्ट्रगलर असणाऱ्या या पाच जणांनी हा बँड सुरु केला. पण, त्यानंतर सुधांशू पांडेला त्याच्या अभिनयात यश मिळू लागलं, बँडला अलविदा केला. सध्या सुधांशू पांडे स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'अनुपमा'मध्ये दिसत आहे. सुधांशूनंतर, बँडमधील इतर चार जणांनी ही बँडचा निरोप घेतला. 2006 मध्ये या बँडचं 'गाने भी दो यारो' हे शेवटचं गाणं आलं, त्यानंतर हा बँड जणू गायबच झाला.