Annu Kapoor Priyanka Chopra Kiss Scene Controversy: अन्नू कपूर (Annu Kapoor) हे हिंदी सिनेसृष्टीतील (Bollywood) टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहेत.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक चित्रपटात काम केलं. अन्नू कपूर हे साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेत स्वत:ला झोकून देतात. त्यांचं अभिनय कौशल्य कायम पडद्यावर दिसून येतं. परंतु, अनेकदा आपल्या वक्तव्यावरुन वादात सापडतात.  त्यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रियांका चोप्राबाबत (Priyanka Chopra) एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.  दरम्यान, आता अन्नू कपूर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

अन्नू कपूर प्रियांका चोप्राबाबत नेमकं काय म्हणाले? (Annu Kapoor reacts to his controversial statement about Priyanka Chopra)

प्रियांका चोप्रा आणि अन्नू कपूर यांनी विशाल भारद्वाज यांच्या 'सात खून माफ' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अन्नू कपूर यांनी या चित्रपटात प्रियांकाच्या पतीची भूमिका साकारली होती. चित्रपटातील एका दृश्यामध्ये प्रियांकाला  अन्नू कपूर यांना किस करायचं होतं.    पण तिने नकार दिला होता. अन्नू कपूर यांनी यासंदर्भात एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. 'जर, तिच्या समोर एखादा नायक, अभिनेता असता तर कदाचित तिला किस घेण्यात कोणतीही अडचण आली नसती', असं त्यांनी म्हटलं होतं. 

अन्नू कपूर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.  अलिकडेच अन्नू कपूर यांनी सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली होती.  या प्रकरणी त्यांनी पुन्हा  एकदा प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,  'मला असं म्हणायचं होतं की, मी त्या चित्रपटाचे नायक नव्हतो, त्यामुळे प्रियांकाने मला किस केलं नाही. ही खरंतर 16 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.  एक पत्रकार मला वारंवार विचारत होता, की प्रियांकाने तुम्हाला का किस केलं नाही. तेव्हा मी त्याला, तिला तसं करायचं नव्हतं, तिची इच्छा नसेल'.

Continues below advertisement

'जेव्हा पत्रकार वारंवार तोच प्रश्न विचारत होता, तेव्हा मी वैतागलो आणि, जर मी हिरो असतो,  तर तिनं किस केलं असतं, असं त्याला उत्तर दिलं', असं अन्नू कपूर म्हणाले. प्रियांकाने किस करण्यास नकार दिल्यावर वाईट वाटले का? असा प्रश्न अन्नू कपूरला विचारले असता, त्यांनी अजिबात फरक पडला नाही, असं उत्तर दिलं.    विशाल भारद्वाजने मला सांगितलं होतं की,  प्रियांका किस करायला थोडी संकोच करत आहे'.

'मी तिला बेटा असं म्हणत होतो.  मी तिच्या वडिलांना ओळखत होतो. विश्व सुंदरी होण्यापूर्वी प्रियांका अंताक्षरीमध्ये आली होती.  विशाल भारद्वाजने जेव्हा मला सांगितले की, ती किसिंग सीन करायला संकोच करत आहे, तेव्हा मी त्यांना सीन कट करायला सांगितलं. विशाल भारद्वाजसारखे दिग्दर्शक सीन कट करत नाही, पण त्यांनी केला', असं अन्नू कपूर म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'गदर' सिनेमातील अभिनेत्रीला 'तेरे नाम' चित्रपटासाठी आलेली ऑफर; तेव्हा नाकारली, आता होतोय पश्चाताप