Ankush Chaudhari wishes Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली तुटेना' (Veen Doghatli Tutena) या मालिकेतून (Serial) घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधानचा (Tejashri Pradhan) चाहतावर्ग खूप मोठा आहे. तेजश्रीने आपल्या कारकिर्दीत मालिकेसह अनेक सिनेमांतही काम केलं आहे. तेजश्री सोशल मीडियातही सक्रीय असते. दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी अभिनेत्री सोशल मीडियात शेअर करत असते. अभिनेत्रीचा आज वाढदिवस. बर्थ डे निमित्त अभिनेत्रीने ब्रेक घेतला आहे. अभिनेत्री सध्या उत्तराखंडमध्ये एन्जॉय करत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त लाखो चाहते आणि तिच्या मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अंकुश चौधरीची तेजश्री प्रधानसाठी खास पोस्ट (Ankush Chaudhari wishes Tejashri Pradhan on birthday)
अभिनेता अंकुश चौधरी या कलाकारानं तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान ही जोडी आपल्याला 'ती सध्या काय करते' या सिनेमात दिसली होती. अंकुश आणि तेजश्रीची मैत्री या सिनेमातून अधिक घट्ट झाली. दरम्यान, तेजश्रीच्या आज वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने अगदीच हटके शैलीत तेजश्री प्रधानला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं 'ती सध्या काय करते' या सिनेमातील व्हिडीओ क्लिप शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सध्या अंकुशची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
तेजश्री आणि अंकुश या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या सिनेमाची तरुणांमध्ये अजूनही क्रेझ पाहायला मिळत आहे. या सिनेमातील गाणी आजही दोन्ही कलाकारांच्या ओठांवर आहे. अंकुशने तेजश्रीच्या खास वाढदिवसानिमित्त 'ती सध्या काय करते' या सिनेमातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केला आहे. तसेच तेजश्री प्रधानला शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकुशने व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे. "ती सध्या काय करते? हे लोकांना आजही पडलेलं कोडं आहे... पण तिचा ‘अनुराग’ म्हणून मला माहित आहे, ती सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय! Happy Birthday @tejashripradhan...तुझी मैत्री आजही तितकीच हक्काची आहे. Always proud of you! ✨ तुझा अनुराग / अन्या". चाहत्यांनीही कमेंट करुन तेजश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
