मुंबई : सुशांतसिहं राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने ट्विटरवर 'जस्टीस' असे लिहित एक पोस्ट शेअर केली आहे "कर्माने भाग्य ठरते" अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे.

Continues below advertisement

‘नशिबाने काहीही घडत नाही. आपण आपल्या कृतीतून आपलं भाग्य तयार करतो. त्यालाच कर्म म्हणतात,’ अशी पोस्ट अंकिताने शेअर केली.'

पुरावे मिळाल्यानंतर रियाला अटक करण्यात आली आहे. रियाचे ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याचंही उघड झालं आहे. रिया सराईत गुन्हेगार नसल्याने तिला रिमांडची गरज नाही. मात्र वेळोवेळी तिला चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे, असं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.

एनसीबीने आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक केली आहे. त्यातील सात जण या तपासाशी थेट संबंधित आहेत तर एनडीपीएस कायद्यातील कलमांतर्गत चौकशी सुरू झाल्यानंतर दोघांना अटक केली गेली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत 14 जून रोजी वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता.

अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सुशांतला न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. या व्हिडीओमध्ये अंकिता पोस्टरसोबत दिसून आली होती. 'देशाला माहिती आहे की, सुशांत सिंह राजपूतसोबत काय झालं? जस्टिस फॉर सुशांत. सीबीआय फॉर SSR' तसेच पोस्टवर #CBIFORSSR लिहिलं होतं.

संबंधित बातम्या :