Ankita Lokhande Vicky Jain Pregnancy Rumours: टीव्ही विश्वातील सुपरहिट जोडी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे स्ट्राँग कपलपैकी एक आहे. ही जोडी नेहमीच चर्चेत असते. सध्या हे कपल आपल्याला मास्टर शेफ्स सिझन 3 मध्ये दिसत आहे. या कपलची केमिस्ट्री, गंमतीशीर मजा - मस्ती आणि कुकिंग बॅटल्स प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. दरम्यान, आज लाफ्टर शेफ्सच्या शूटवर दोघांचा अंदाज खूप खास दिसत होता. कॅमेऱ्यासमोरची त्यांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातील जवळीक खूपच गोड होती. यावेळी उपस्थित पापाराझींनी त्यांना एक वैयक्तिक प्रश्न विचारला. तेव्हा त्यांची प्रतिक्रिया ही पाहण्यासारखी होती.
लवकरच गुड न्यूज मिळणार का? (Ankita Lokhande and Vicky Jain grab attention)
अंकिता आणि विकी जैन आज लाफ्टर शेफ्सच्या शूटसाठी आले होते. यावेळी हे कपल खूप आनंदी दिसत होते. स्टायलिश अंदाजात त्यांनी एन्ट्री घेतली. पापाराझी या कपलचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शूट करत होते. यावेळी पापाराझीने मागून एक प्रश्न विचारला. 'गुड न्यूज मिळणार आहे का?'. यानंतर अंकिता किंवा विकीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अंकिताचा रिअॅक्शन हा बघण्यासारखा होता. पोझ देऊन हे कपल निघून गेले.
अंकिता आणि विकी हे कायम आपल्या स्टायलिश अंदाजाने सर्वांना इम्प्रेस करतात. दोघेही एकत्र सुंदर दिसतात. यावेळी अंकिताने खास शूटसाठी, सुंदर व्हाइट कोट आणि पँट घातली होती. तर, विकीने मरुन रंगाचा ए- लाइन शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली होती. हे कपल एकत्र कायम सुंदर दिसतात. नेटकऱ्यांनीही त्यांच्या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करुन, अंकिता प्रेग्नेंट आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
याआधी दोघे लवकरच आई- वडील होणार, अशी बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली होती. मात्र, अंकिताने स्वत:च यावर उत्तर देत, आपण गरोदर नसल्याचं सांगितलं होतं. गरोदर राहिल्यानंतर स्वत: याची माहिती देईन, असंही अंकिता म्हणाली होती. अंकिता आणि विकी यांनी 2021 मध्ये मुंबईतील एक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर ही जोडी अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'माझ्या लेकीकडे न्यूड फोटोंची मागणी'; अक्षय कुमारनं सांगितलं नेमकं काय घडलं, नितारा आहे तरी कोण?
