Aniruddhacharya Criticizes Ranveer Allahbadia: रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia), समय रैना (Samay Raina), आशीष चंचलानी (Ashish Chanchlani) आणि अपूर्वा मखीजा (Apoorva Mukhija) सहभागी झालेल्या इंडियाज गॉट लेटेंटच्या (India's Got Latent) एका एपिसोडमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तेव्हापासूनच रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी आणि अपूर्वा मखीजा यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. तिघांवरही अनेक एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी बोलावलं. अपूर्वा मखीजा आणि आशिष चंचलानी यांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. पण, रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांना दोन वेळा समन्स धाडल्यानंतरही ते अद्याप पोलिसांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. समय रैना देशाबाहेर असल्यानं त्यानं मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी वेळ मागितला आहे. तर, दुसरीकडे रणवीर अलाहाबादियानं पोलिसांना त्याच्या घरी येऊन त्याचा जबाब नोंदवण्याची विनंती केली आहे. पण, पोलिसांनी रणवीरची मागणी फेटाळून लावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर आणि समय दोघेही महाराष्ट्र सायबर सेलच्या संपर्कात आहेत आणि लवकरच त्यांचे जबाब नोंदवू शकतात. रणवीरच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अनेकजण त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. अशातच आता अनिरुद्धाचार्यांनीही त्याच्यावर निशाणा साधला आहे. 

अनिरुद्धाचार्यांनी रणवीर अलाहाबादियावर टीकेची झोड उठवत समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'वरही अनिरुद्धाचार्यांनी अश्लील टिप्पणी केली आहे. अनिरुद्धाचार्यांनी रणवीर अलाहाबादियाला नालायकही म्हणून संबोधलं आहे. तसेच, रणवीरनं आपल्या आई-वडिलांसाठी चुकीच्या शब्दांचा वापर केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

रणवीर अलाहाबादियावर बोलताना काय म्हणाले अनिरुद्धाचार्य? 

अनिरुद्धाचार्यांच्या कथावाचनादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, "कोणीतरी अलाहाबादिया नावाचा मुलगा आहे, त्यानं आपल्या आईसाठी चुकीच्या शब्दांचा वापर केला आहे. तो म्हणतोय की, आई-वडील जे असतात ना, आई-वडील, पती-पत्नी म्हणजे, आई-वडील... आता आई-वडीलांचं जे पर्सनल काम आहे, त्यामध्ये कोणत्याही मुलाचा काय हस्तक्षेप असू शकतो? पण, तो म्हणतोय की, मलासुद्धा त्यामध्ये सहभागी व्हायचंय. विचार करा आजची पिढी कुठे जातेय... मी बोलूही शकत नाही, त्या नालायकानं काय शब्द वापरलेत..." 

अश्लीलतेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची कठोर पावलं 

केंद्र सरकारने अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कंटेंटवरील मर्यादा ठेवण्यासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्म्सना आयटी कायदा 2021 च्या नियमांचे पालन करावे लागेल. याअंतर्गत, प्रत्येक प्लॅटफॉर्मला स्वतःची स्वयं-नियामक संस्था तयार करावी लागेल, जी त्यांच्या कंटेन्टवर नियंत्रण ठेवेल. जर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अश्लील किंवा आक्षेपार्ह कंटेन्ट दाखवला गेला असेल तर, तो दंडनीय गुन्हा मानला जाईल. याव्यतिरिक्त, लहान मुलांसाठी अडल्ट (A) रेटेड कंटेंट रोखण्यासाठी सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्सना आपला कंटेट वयोगटानुसार क्लासीफाय करावा लागेल.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Doctor on Sushant Singh Rajput: "गेली दोन वर्ष सुशांत सिंह राजपूतचा आत्मा आमच्याकडे येतोय..."; प्रसिद्ध डॉक्टरच्या वक्तव्यानं खळबळ