Trutpi Dimri on Animal : संदीप वांगा रेड्डीने दिग्दर्शित केलेला अॅनिमल (Animal) हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. अतोनात हिंसाचार आणि बोल्ड सीनमुळे हा सिनेमा तुफान चर्चेत आला. दरम्यान अॅनिमलमधील (Animal) काही सीन्सवर अनेकांनी आक्षेप घेतला. लेखक जावेद अख्तर यांनीही अशा सिनेमांना प्रतिसाद मिळतो म्हणून चिंता व्यक्त केली. हा सिनेमा रणबीर कपूरच्या हिट सिनेमांपैकी एक आहे. तर बॉबी देओलनेही छोट्या रोलच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, या सिनेमानंतर अभिनेत्री तृत्पी डिमरी (Trutpi Dimri) तुफान चर्चेत आली. बॉबी देओलप्रमाणे तिचाही रोल अगदी छोटा होता. मात्र, त्या रोलच्या जोरावर ती स्टार झाली. आता तिने अॅनिमलमधील इंटीमेट सीनबाबत भाष्य केलं आहे. 


अॅनिमल रिलीज झाल्यानंतर तृत्पी डिमरी तुफान चर्चेत आली. प्रेक्षक देखील तिला नॅशनल क्रश वगैरे म्हणू लागले. इन्स्टाग्रामवर तिचे फॉलोवर्स तुफान वाढले. अॅनिमलमध्ये तृत्पीचा रोल केवळ 12 मिनीटांचा होता. तिने सिनेमात झोयाची भूमिका बजावली होती. दरम्यान, आता तृत्पी डिमरीने अॅनिमलमुळे व्यक्तीगतरित्या किती यश मिळाले? याबाबत भाष्य केलं आहे. 


काय म्हणाली तृत्पी डिमरी?


एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तृत्पी डिमरी म्हणाली, "अॅनिमल या सिनेमाला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. मलाही प्रेक्षकांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी सिनेमातील स्टार लोकांना धन्यवाद म्हणते. कारण मला वाटते की, मी भाग्यवान आहे. त्यामुळेच मला या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली."


"माझ्या आयुष्यातील हा खास क्षण आहे. चांगले वाटते जेव्हा तुम्ही काम करता आणि प्रेक्षक तुम्हाला चांगला प्रतिसाद देतात. तुम्ही काम करताना याच गोष्टींची अपेक्षा करत असतात आणि अॅनिमलमधून प्रेक्षकांनी अशाच पद्धतीने प्रतिसाद दिला.", असेही तृत्पी डिमरी पुढे बोलताना म्हणाली. 


आशिकी 3 मध्येही दिसणार तृत्पी डिमरी  


अॅनिमलच्या यशानंतर तृत्पी आता आशिकी 3 मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि तृत्पी डिमरी एकत्र काम करताना दिसणार आहेत. आशिकी 3 च्या निर्मात्यांनी तिची मुख्य भूमिकेसाठी निवड केली असल्याचे बोलले जात आहे. अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 2024 मध्ये रिलीज होणार आहे. या साठी इतर कलाकारांचीही लवकरच निवड करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप तृत्पीच्या सिनेमातील निवडीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sushmita Sen : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सुष्मिता सेनची पोस्ट व्हायरल; संविधानाची प्रस्तावना केली शेअर करत म्हणाली, 'द्वेषाचे राजकारण'