मुंबई : अनिल कपूर (Anil Kapoor) आणि सुनीता कपूर (Sunita Kapoor) यांचा काल 19 मे रोजी लग्नाचा वाढदिवस होता. आपल्या वेडिंग अॅनिव्हर्सरी दिवशी अनिल कपूर यांनी ट्विटरवर आपली लव्ह स्टोरी शेअर केली आहे. यावेळी त्यांनी सांगितलंय की, त्यांच्यासाठी वेडिंग अॅनिव्हर्सरीपेक्षा प्रपोजल अॅनिव्हर्सरी अधिक महत्वाची आहे. आम्ही वेडिंग अॅनिव्हर्सरीसोबतच प्रपोज केलेला दिवस प्रपोजल अॅनिव्हर्सरी म्हणून साजरा करतो, असं अनिल कपूर यांनी सांगितलंय. त्यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करताना आपली पत्नी सुनीता कपूर (Sunita Kapoor) यांच्यासोबतचा एक फोटो टाकला आहे आणि सोबत एक ऑडीओ सुद्धा टाकलाय, ज्यामध्ये ते आपल्या लव्ह स्टोरी आणि प्रपोजल बद्दल माहिती देत आहेत.


या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल कपूर यांनी म्हटलंय की, त्याकाळी 17 मे ही तारीख माझ्यासाठी फार महत्त्वाची होती. कारण त्या रात्रीपासून माझ्या लव्ह स्टोरीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. 17 मे रोजी मी एक मोठ्या प्रोजेक्टचा चित्रपट साइन केला होता. आणि दुसऱ्याच दिवशी 18 मे रोजी सुनिताला लग्नाची मागणी घातली होती. हे दोन्ही दिवस माझ्यासाठी आनंदाचे होते, मात्र तितकेच पेचात पाडणारेही होते. कारण मी एक एक पावलं पुढे चालत होतो, परंतु असा एक क्षण आला जेथे मला प्रेम किंवा करिअर या दोघांपैकी एकाची निवड करायची होती. मात्र मी माझ्या प्रेमाची निवड केली, असं अनिल कपूर यामध्ये म्हणतात.

अनिल कपूर यांचा फिटनेस आणि चेहऱ्यावरील हसू तरुणांना लाजवेल असंच आहे. जबरदस्त अभिनय, काम करण्याची जिद्द याच्या बळावर त्यांनी एक वेगळी ओळख बनवली आहे. आजही ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मात्र एक काळ असा होता जेव्हा त्यांना अभिनय किंवा प्रेम या दोघांपैकी एकच गोष्टी निवडायची होती. या कठीण प्रसंगामध्ये अनिल कपूर ठाम राहिले आणि त्यांनी एक अचूक निर्णय घेतला, ज्यामुळे आज त्यांच्यासोबत अभिनय आणि त्यांचं प्रेम अर्थात पत्नी सुनिता कपूरदेखील आहेत. या प्रसंगाबाबत त्यांनी आपल्या भावना ट्वीट करत व्यक्त केल्या आहेत.