Anil Kapoor Dawood Ibrahim Dhurandhar 2: नुकत्याच रिलीज झालेल्या 'धुरंधर 2'नं (Dhurandhar 2 Movie) बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar The Revenge Box Office Collection) तुफान आणलंय. पहिल्याच दिवशी आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर 2'नं कोटींच्या कोटी उड्डाणं घेत, भल्या भल्या दिग्गजांना आपल्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडलं. अशातच पहिला विकेंडही रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर सिनेमानं गाजवला. धमाकेदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर 2'नं आपलं बस्तान बसवलं आहे. अगदी बॉक्स ऑफिसपासून सोशल मीडियापर्यंत आदित्य धर आणि रणवीर सिंह यांचा 'धुरंधर 2' धुमाकूळ घालतोय. पण, एवढा गाजणारा सिनेमा नव्वदच्या दशकातल्या सुपरस्टारनं नाकारलेला आणि त्याबाबत एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्यानं स्वतः खुलासा केला आहे.  

Continues below advertisement

'धुरंधर 2' च्या निर्मितीच्या प्रत्येक टप्प्याशी, म्हणजेच प्री प्रोडक्शन आणि शुटिंग करण्यापासून ते अगदी पोस्ट प्रोडक्शनशी (Post Production) संबंधित किस्से सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यात एका बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) चाही किस्सा व्हायरल होतोय. यामध्ये अभिनेत्यानं सुपरडुपर हिट ठरलेला सिनेमा का नाकारला? याबाबत खुलासा केला आहे. अभिनेत्याचं कारण ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

इंडिया टूडेच्या एका कार्यक्रमात अनिल कपूर यांची मुलाखत घेण्यात आलेली. राजदीप सरदेसाई यांनी अनिल कपूर यांची मुलाखत घेतलेली. त्यावेळी "जर आदित्य धर तुमच्याकडे आले आणि म्हणाले की, ते 'धुरंधर 3' बनवत आहेत, आणि तुम्हालाही त्यांनी त्यांच्या लियारीच्या टोळीत (Gang Of Lyari) सामील होण्यासाठी विचारलं, तर तुम्ही तो सिनेमा कराल का?"

Continues below advertisement

अनिल कपूर यांनी उत्तर देताना सांगितलं की, "आदित्य धर माझ्याकडे 'धुरंधर 2'साठीच आलेले. त्यांची इच्छा होती की, मी फिल्ममध्ये कॅमिओ करावा... आज मी जे काही आहे, त्याचं कारण आहे, माझं प्रोफेशनलिज्नम... फक्त टॅलेंटच्याच जोरावर तुम्ही इथे पोहोचू शकत नाही... ज्यावेळी मला विचारणा झाली, त्यावेळी मी दुसऱ्या फिल्मसोबोत कमिटेड होतो... ती फिल्म लवकरच रिलीज होणार आहे आणि तीसुद्धा खूप छान फिल्म आहे... 'धुरंधर 2' नाकारणं माझं नुकसान होतं, पण ठीक आहे..."

अनिल कपूर यांचा दाऊदसोबतचा फोटो व्हायरल (Dawood Ibrahim Anil Kapoor Photo Viral)

अनिल कपूर यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालंय. तर, दुसरीकडे सोशल मीडियावर अनिल कपूर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. व्हायरल होणारा फोटो कोणा एका पब्लिक इव्हेंटचा आहे. त्या इव्हेंटमध्ये अनिल कपूर दाऊद इब्राहिमच्या बाजूला उभे आहेत. हा फोटो पाहून सोशल मीडियावर वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दाऊद इब्राहिमशी असलेल्या याच जवळीकीमुळे अनिल कपूर यांनी 'धुरंधर 2' सिनेमा नाकारला असावा, असा दावाही अनेकजण करत आहेत.  

दरम्यान, असं म्हटलं जातं की, 1990 च्या दशकात दाऊद इब्राहिमचा बॉलिवूडवर मोठा प्रभाव होता. यासंदर्भात अनेक उदाहरणंही दिली जातात. सिनेसृष्टीत दाऊदच्या संमतीशिवाय साधं पानंही हलत नव्हतं, असेही अनेक किस्से सांगितले जातात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dhurandhar 2 Full Movie Leaked In HD: 400 कोटींची 'धुरंधर 2', पायरेटेड साईट्सवर HD मध्ये लीक; निर्मात्यांचं टेन्शन वाढलं