Angelina Jolie : हॉलिवूडची प्रसिद्ध जोडी अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) आणि अभिनेता ब्रॅड पिट (Brad Pitt) आता वेगळे झाले असले, तरी ते दोघेही नेहमीच चर्चेत असतात. सध्या या जोडीमध्ये एका फ्रेंच वाईनरीवरून कायदेशीर लढाई सुरु आहे. 2008 मध्ये दोघांनी मिळून ही वाईनरी खरेदी केली होती. तर, नुकतीच ही केस अँजेलिनाने जिंकली आहे. पण, या निकालानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. अभिनेत्रीच्या कंपनीने आता ब्रॅड पिट विरुद्ध 250 दशलक्ष डॉलरचा खटला दाखल केला आहे. अँजेलिना जोलीने पूर्व पती आणि अभिनेता ब्रॅड पिटवर फसवणूक आणि चोरीचा आरोप केला आहे.
अँजेलिनाच्या कंपनीने ब्रॅड पिटवर 250 दशलक्ष डॉलर्सचा दावा ठोकला. अँजेलिनाची कंपनी, नोव्हेल एलएलसीने म्हटले की, ब्रॅडने त्यांचा संयुक्त फ्रेंच वाईन व्यवसाय अँजेलिनाकडून काढून घेतला आणि नंतर अतिशय गुप्तपणे त्यातील मालमत्ता त्याच्या मित्रांकडे आणि काही 'व्हॅनिटी' प्रकल्पांकडे वळती केली. मात्र, या प्रकरणाने देखील आता एक नवे वळण घेतले आहे. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान अभिनेत्रीने त्यांच्या नात्याबद्दल काही खुलासे केले आहेत. या नात्यात आपल्याला सतत अपमानास्पद वागणून मिळाल्याचे तिने म्हटले आहे.
अभिनेत्रीसह मुलांनाही केली मारहाण
अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांनी 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या जोडीला 6 मुले आहेत. हे प्रकरण 2016चे आहे. या केसमध्ये आपली बाजू मांडताना अँजेलिनाने म्हटले होते की, एका खाजगी विमानात ब्रॅडने तिच्याशी गैरवर्तन केले होते. यावेळी दाम्पत्याची मुलेही त्याचा विमानात उपस्थित होती. रिपोर्ट नुसार, अँजेलिनाने एफबीआय अधिकाऱ्याला सांगितले की, ब्रॅडने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यावेळी त्यांची मुलेही त्यांच्यासमोर होती. ब्रॅडने अँजेलिनाला जबरदस्तीने विमानाच्या मागच्या बाजूला नेले आणि तिचा खांदा जोरात धरून म्हणाला की, तू संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त केले आहेस. इतकेच नव्हे तर, ब्रॅडने त्यांच्या एका मुलाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत, त्याला मारहाण केली होती, असे देखील तिने सांगितले.
अँजेलिनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
सदर प्रकरण लॉस एंजेलिसच्या न्यायालयात सुरु आहे, या प्रकरणात असा आरोप करण्यात आला आहे की, पिटने जोलीला वाईनरीमधील तिची भागीदारी ‘नॉनडिक्लोजर करारा’वर विकण्याची अट घालण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ती आपल्यावर आणि आपल्या मुलांवर झालेले भावनिक आणि शारीरिक शोषण याबद्दल सार्वजनिकरीत्या आवाज उठवू शकणार नव्हती. वायनरीच्या मालकी हक्कावरून सुरु झालेला हा वाद आता अनेक नवी वळणे घेत आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या या वक्तव्यांमुळे मनोरंजन विश्व हादरले आहे.
हेही वाचा :