Anaya Bangar On Relationship With Men: अनाया बांगर (Anaya Bangar) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे (Entertainment) चर्चेत आहे. ती सोशल मीडियातही प्रचंड सक्रीय असते. तिनं अलिकडेच कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये (Pranit More) हजेरी लावली होती. या स्टँड - अप शोमध्ये तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. यावेळेस अनायानं सेक्शुअल ओरिएंटेशनबाबतही खुलासा केला. तिला पुरुष आवडतात आणि ती स्ट्रेट आहे, असं अनाया म्हणाली.
अनाया नेमकं काय म्हणाली? (Anaya Bangar On Relationship)
अनाया बांगरने सांगितलं की, तिला पुरुषांमध्ये आवड आहे. अनायाचं हे वक्तव्य सोशल मीडियापर्यंत पोहोचताच प्रचंड व्हायरल झाले. यावेळी तिनं पार्टनरमध्ये नेमकं कोणती क्वालिटी हवी आहे, याबद्दलही सांगितले. अनायाच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय? तिला नेमका कसा साथीदार हवा? हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना असते. दरम्यान, स्टँड - अप शोमध्ये तिनं याबाबत खुलासा केला.
प्रणित मोरेनं अनायाला, 'तुझ्या आयुष्यात कुणी आहे का?' असा प्रश्न विचारला. 'सध्या कुणी नाही. पण कुणीतरी आयुष्यात यावं, अशी माझी इच्छा आहे', असं अनायानं उत्तर दिलं. 'तुला नेमके कसे लोक आवडतात?' असा प्रश्न प्रणितने अनायाला विचारला. तेव्हा अनायानं, 'मला पुरुष आवडतात. माझी सेक्शुअल ओरिएंटेशन स्ट्रेट आहे. सध्या मी RIGHT व्यक्तीची माझ्या आयुष्यात येण्याची वाट पाहत आहे. त्यानंतर मी त्या व्यक्तीला डेट करेन', असं अनाया म्हणाली.
प्रणित मोरेच्या स्टँड अप शोमध्ये अनाया बांगर नेमकं काय म्हणाले? (Anaya Bangar in Pranit More Stand Up Comedy Show)
'तुला कोणत्या क्वालिटीचा पार्टनर हवा?', असा प्रश्न अनायाला प्रणितने विचारले. तेव्हा अनायाने, 'मला एक उंच आणि पिळदार शरीरयष्टीचा पार्टनर हवा. तो थोडा भावनिकही असावा', या क्वालिटी अनायाने शेअर केल्या. प्रणितने अनायाला, क्रिकेटपटूंकडून डीएम येतात का? असा प्रश्न विचारला. यावर अनायाने सांगितलं की, 'मी क्रिकेट खेळते. मी बऱ्याच क्रिकेटपटूंसोबत खेळली आहे', असं अनायानं उत्तर दिलं. क्रिकेटपटूंच्या डायरेक्ट मेसेजचा प्रश्न तिनं हसून टाळला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
प्रसिद्ध गायकाचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
