Ananya Panday,Ishaan Khattar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अभिनेता ईशान कट्टार (Ishaan Khattar) यांच्या रिलेशनशिपबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू होती अनन्यानं आणि ईशाननं त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळलं होतं. पण रिपोर्टनुसार, आता दोघांनी ब्रेक-अप केला आहे.


'खाली पीली' पासून सुरू झाली लव्ह स्टोरी 
खाली पीली या चित्रपटामध्ये ईशान खट्टरनं आणि अनन्या पांडेनं प्रमूख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच शोमध्ये ईशान आणि अनन्यानं एकत्र हजेरी लावली.  
 
परस्पर सहमतीनं घेतला निर्णय  
रिपोर्टनुसार, तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर परस्पर सहमतीनं अनन्या आणि ईशानं ब्रेक-अप करण्याचा निर्णय घेतला. पण ब्रेक-अप झाला तरी ते मित्रीचे नाते असंच ठेवणार आहेत. रिपोर्टनुसार, दोघांमध्ये सामंजस्‍य कमी होते. त्यामुळे त्यांनी ब्रेक-अप करण्याचा निर्णय घेतला. 






काही दिवसांपूर्वी शाहिदनं त्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर होती. या पोस्टमध्ये ईशान आणि अनन्य यांचे काही रोमँटिक पोजमधील फोटो आहेत. त्यामुळे आता हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha