Anant -Radhika Wedding Mumbai Traffic : आशियातील सर्वात श्रीमंत  उद्योगपती म्हणून ओळख असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा शाही विवाह सोहळा मुंबईत पार पडणार आहे. शुक्रवारी, 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. या लग्नासाठी देशभरातून उद्योगपती, व्यावसायिक, सेलिब्रिटी आणि राजकारणी यांची उपस्थिती असणार आहे. याचा परिणाम मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. वाहतूक व्यवस्थेत मुंबई पोलिसांनी बदल केले आहेत. 


मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळ्याला आंतरराष्ट्रीय आणि भारतातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. वांद्रे बीकेसी येथील जिओ वल्ड सेंटर येथे हा लग्न सोहळा होणार असून 12 जुलै ते 15 जुलै हा सोहळा चालणार आहे. या सोहळ्याला येणाऱ्या व्हीआयपींमुळे वाहतूक मार्गात बदल केली जाण्याची शक्यता आहे. आधीच पावसाचे दिवस असून यात मुंबईत वाहतूक कोंडीदेखील होत असते. आता, या विवाहसोहळ्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल केल्याने त्याचा परिणाम मुंबईतील वाहतूक कोंडीवर होण्याची शक्यता आहे. 


बहुचर्चित या लग्नासाठी बीकेसीतील सात मार्ग हे वाहतुकीसाठी वाहनांच्या रहदारीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत माहिती जारी केली आहे. 



>> या मार्गांवर प्रवेश बंद


लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून, धीरूबाई अंबानी स्क्वेअर अॅव्हेन्यू लेन-3 मार्गे इंडीयन ऑईल पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन, हॉटेल ट्रायडंट तसेच एमटीएनएल कुर्त्याच्या दिशेने जाण्याकरिता (कार्यक्रमाकरिता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. 



>> पर्यायी मार्ग :-


वन बीकेसीकडून येणारी वाहतूक ही लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून डावे वळण घेवून पुढे डायमंड गेट नं.8 समोरून नाबार्ड जंक्शन येथून उजवे वळण घेतील. पुढे डायमंड जंक्शन येथून उजवे वळण घेवून धीरूबाई अंबानी स्कवेअर/इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथून पुढे बीकेसी परिसरात मार्गस्थ होतील.



>> या मार्गांवर प्रवेश बंद


कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन आणि बीकेसी परिसरातील सर्व वाहनांना बीकेसी कनेक्टर उड्डाणपुलाच्या दिशेने जाण्याकरिता धीरुभाई अंबानी स्क्वेअर/इंडियन ऑईल पेट्रोलपंप येथून (कार्यक्रमाकरिता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. 


>> पर्यायी मार्ग :- 


कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन, नाबार्ड जंक्शन डावे वळण व डायमंड गेट नं.8  समोरून लक्ष्मीटॉवर जंक्शन येथून उजवे वळण घेवून बीकेसी परिसरात मार्गस्थ होतील.


>> प्रवेश बंद मार्ग :-


भारत नगर, वन बीकेसी, वुई वर्क गोदरेज बीकेसी वरुन (कार्यक्रमाकरिता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना जिओ कन्वेंशन सेंटर गेट क्र. 23 येथून अमेरिकन दुतावास, एमटीएनएल जंक्शनच्या दिशेने जाण्याकरिता प्रवेशबंदी राहील.


>> पर्यायी मार्ग :- 


कौटील्य भवन उजवे वळण-पुढे अॅव्हेण्यू 1 रोडने इन्शुरन्स इन्स्टिट्यूट कार्यालय मागील बाजू-अमेरिकन दुतावास मागील बाजू धीरुभाई अंबानी स्कुल येथून इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.


>> प्रवेश बंद मार्ग :-


एमटीएनएल जंक्शन येथून (कार्यक्रमाकरिता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना सिग्नेचर /सनटेक बिल्डींग येथून अमेरीकन दुतावास, जिओ वर्ल्ड कन्चेक्शन सेंटर, बीकेसी कनेक्टर उड्डाणपुलाच्या दिशेने जाण्याकरिता प्रवेशबंदी राहील.


>> पर्यायी मार्ग :- 


धीरुभाई अंबानी स्कुल डावे वळण अॅव्हेण्यू 1 रोडने अमेरीकन वकालत मागील बाजू-इन्शुरन्स इन्स्टिट्यूट कार्यालय मागील बाजू वी वर्क बिल्डींग उजवे वळण - गोदरेज बीकेसी डावे वळण घेवून इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.


एकदिशा :- 1) लतिका रोड हा अंबानी स्क्वेअर ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंत वाहतूकीसाठी एक दिशा मार्ग (वन-वे) करण्यात येत आहे.


2) अॅव्हेन्यू 3 रोड हा कौटील्य भवन ते अमेरीकन दुतावास जंक्शन पर्यंत वाहतूकीसाठी एक दिशा (वन-वे)  करण्यात येत आहे.