Rihanna Team Arrived At Jamnagar:  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला  (Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Function) धमाकेदार सुरुवात झाली आहे. या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक मोठे स्टार्स सहभागी होणार आहेत. अनेक सेलिब्रेटींनी आता जामनगरमध्ये (Jamnagar) येण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन पॉप सिंगर रिहाना (Pop Singer Rihanna) ही आपल्या टीमसोबत जामनगरमध्ये दाखल झाली आहे.  


पॉप सिंगर रिहाना जामनगरमध्ये दाखल 


हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाची टीमही जामनगरला पोहोचली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रिहानाची संपूर्ण टीम एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत आहे.






अंबानींकडून रिहानाच्या टीमचे ग्रँड वेलकम


जामनगरला पोहोचल्यानंतर सर्व पाहुण्यांचे अंबानी कुटुंबीयांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. या वेळी जामनगरमध्ये अंबांनींच्यावतीने परदेशी पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.  समोर आलेल्या व्हिडीओनुसार,  रिहानाच्या टीममधील सर्व लोक हे सुंदर क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना दिसत आहेत.






रिहाना जामनगरमध्ये दाखल 


याशिवाय रिहानाशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याची खूप चर्चा आहे. रिहानासोबत तिच्या कॉन्सर्टशी संबंधित अनेक मोठ्या वस्तू दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रिहाना काय भारतात कायमची राहण्यासाठी आली का, असा प्रश्न काहींनी केला आहे. 




दरम्यान, मुकेश अंबानी यांनी त्यांच्या परदेशी पाहुण्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. रिहानाच्या सुरक्षेसाठी अनेक वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. इतकी सुरक्षा पाहिल्यानंतर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येत आहेत.