Anant Ambani Radhika Merchant :  सध्या अनंत अंबानी (Anant Ambani ) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग फंक्शनची चर्चा सुरु आहे. गुजरातमधील (Gujarat) जामनगर (Jamanar) येथे 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान अनंत आणि राधिकाचे प्री वेडिंग कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. तसेच अनेक नामांकित देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. इतक सगळं असताना अंबानी कुटुंबियांनी या कार्यक्रमांसाठी गुजरातमधील जामनगर गावाची का निवड केली असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. यामागे एक विशेष कारण आहे. 


जगातील आणि देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत येणाऱ्या अंबांनींनी त्यांच्या मुलाच्या लग्नाआधीच्या विधींसाठी जामनगरची निवड का केली या प्रश्नाचं उत्तर अनेकजण शोधत आहे. दरम्यान जामनगर आणि अंबानी कुटुंबियांचं एक खास आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. याविषयी अनंत अंबानीने नुकतच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता. 


म्हणून जामनगरची केली निवड


अनंत अंबानीचे बालपण हे जामनगरमध्ये गेले आहे. तसेच आजी कोकिलाबेन अंबानी यांचा देखील जन्म जामनगरमध्ये झाला होता. तसेच आजोबा धीरुभाई अंबानी आणि वडिल मुकेश अंबानी यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात देखील जामनगर येथूनच केली होती. त्यामुळे जामगनरसोबत अंबानी कुटुंबियांचे विशेष नाते आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी वेड इन इंडिया म्हणजेच भारतात लग्न करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे अंबानी कुटुंबियांनी या कार्यक्रमासाठी जामनगरची निवड केली. 






अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमांना बॉलीवूडकरांची मंदियाळी 


मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 1 मार्च ते 3 मार्चदरम्यान त्यांचे प्री वेडिंगचे फंक्शन होणार आहेत. या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. बॉलिवूडपासून साऊथच्या सिने तारका जामनगरला पोहचलेत. तसेच सलमान खान, अभिषेक बच्चन, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर यांसारखे अनेक कलाकार या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार आहेत. आता नुकतच रणबीर कपूर आणि आलियासह लेक राहा देखील या कार्यक्रमांसाठी पोहचली आहे. 


ही बातमी वाचा : 


Anant Ambani Radhika Merchant :  राधिका - अनंतच्या प्री वेडिंगच्या फंक्शनसाठी कपूर परिवार पोहचला, आलिया - रणबीरसह राहानेही वेधलं लक्ष