Anant Radhika Wedding:  अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शाही विवाह सोहळा (Anant Ambani Radhika Merchant Wedding) 12 जुलै रोजी पार पडला. नुकतेच 12 जुलै रोजी विवाह सोहळा पार पडल्यानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद कार्यक्रम आणि 14 जुलै रोजी ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यात देश-विदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती  उपस्थित होत्या. या पाहुण्यांच्या जेवणासाठी तब्बल 2500 खाद्यपदार्थांची रेलचेल होती. यामध्ये मराठमोळ्या पदार्थांचाही समावेश होता. 


 अनंत आणि राधिकाच्या लग्नात देश-विदेशातील खास  डिशेज ठेवण्यात आले होते. लग्नसोहळ्यात देशविदेशातील मिळून तब्बल असे 2500 शाकाहारी पदार्थ पाहुण्यांसाठी तयार करण्यात आले होते.  या लग्नसोहळ्यात  वेगवेगळ्या राज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये तिथल्या पदार्थांचे वेगळे स्टॉल होते. यात मराठमोळ्या पदार्थांची देखील रेलचेल होती. महाराष्ट्राच्या स्टॉलवर राज्यातील पारंपारिक पदार्थ पाहुण्यांना चाखायला मिळाले. 


महाराष्ट्राच्या कोणत्या पदार्थांचा समावेश? 


महाराष्ट्राच्या स्टॉलवर मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल होती. या निमित्ताने पाहुण्यांना महाराष्ट्रातील मराठी पदार्थांची चव चाखण्यास मिळाली.  


महाराष्ट्राच्या स्टॉलवर मिरची शेंगदाण्याचा ठेचा, मिरची कैरी ठेचा, भरलेली वांगी, पुणेरी बटाटा, बटाट्याची भाजी, डाळिंबी उसळ, मसाले भात असे पदार्थ होते. तर, डेझर्टमध्ये महाराष्ट्रातला पारंपारिक पदार्थ मोदकाची चव चाखण्याची संधी पाहुण्यांना मिळाली. 




अंबानी कुटुंबच्यावतीने 15 जुलै रोजी माध्यम प्रतिनिधी आणि इतर काही पाहुण्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी जेवणाचा मेन्यू समोर आला. 


या स्वागत समारंभात नारळ पाणी, विविध फळांचे ज्यूस, रिलायन्सचे उत्पादन असलेल्या कॅम्पा कोलाचे सॉफ्ट ड्रिंक्स विविध पेय होत. वाराणसीमधील स्पेशल खास अस्सल रबडी लस्सीसह पारंपरीक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या लस्सीचे प्रकार होते.