Shivkumar Sharma : प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा (Shivkumar Sharma) यांचे निधन झाले आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने संगीत विश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शिवकुमार यांना श्रद्धांजली वाहिली. आता अमूल या कंपनीनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनोख्या पद्धतीनं त्यांना आदरांजली वाहिली आहे. 


अमूलची पोस्ट 
अमूलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये शिवकुमार यांचे संतूर वादन करतानाचे चित्र दिसत आहे. त्या फोटोवर '....उनके हर सांस में साज था' असं लिहिलेलं दिसत आहे. तसेच त्यावर, '1938-2022' असंही लिहिलेलं आहे. या फोटोला '#अमूल टॉपिकल : महान उस्ताद संतूर वादक यांना विनम्र अभिवादन', असं कॅप्शन देण्यात आलं आहे.  अमूलनं शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. 






पंडित शिवकुमार शर्मा (Shivkumar Sharma) यांच्यावर आज मुंबई येथे  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या राहुल आणि रोहित शर्मा या दोन मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. मुखाग्नी देण्यात आल्यानंतर मुंबई (Mumbai) पोलिसांच्या पथकाने तीन राऊंड फायर करत पंडित शिवकुमार शर्मा अखेरची मानवंदना दिली. यावेळी शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच त्यांचे चाहते उपस्थित होते. 


1956 साली त्यांनी व्ही. शांताराम यांच्या 'झनक झनक पायल बाजे' या गाण्याला संगीत दिलं होतं. 1967 साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत 'कॉल ऑफ द व्हॅली' ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली होती जी अप्लावधीच प्रसिद्ध झाली. शिवकुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी,  संगीतकार विशाल ददलानी, अमजद अली खान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन पंडित शिवकुमार शर्मा  यांना श्रद्धांजली वाहिली. 


हेही वाचा :