Atul Parchure :  अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी मुंबईत (दि.12) रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतला मोठा धक्का बसलाय. अतुल परचुरे हे अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंजत होते. यावर मात करण्याचा प्रयत्न करत त्यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवरही कमबॅक करण्याचा निर्णय घेतला होता. पण रंगभूमीवरचा हा प्रवेश होण्याआधीच अतुल परचुरे हे काळाच्या पडद्याआड गेले. 


अतुल परचुरे यांचा झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला होता. इतकच नव्हे तर त्यांना नाट्य गौरववेळी परीक्षकाचीही भूमिका बजावली होती. त्यावेळी त्यांनी अमृता देशमुख हिच्या नियम व अटी लागू या नाटकाचंही परीक्षण केलं होतं. अमृताने अतुल परचुरेंसोबतची ही आठवण शेअर केली आहे.                        


अमृताची पोस्ट काय?


अमृताने अतुल परचुरेंसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, 'अतुल परचुरे सर..माझी पहिलीच भेट झाली ती "नियम व अटी लागू" बघायला ते झी नाट्य गौरव चे परिक्षक म्हणून आले होते तेव्हा...मध्यंतरात त्यांनी येऊन सांगितलं की "छान काम करतेयस..फार छान"..अर्थातच खूप छान वाटलं ते ऐकून पण त्यावर पहिली गोष्ट मला हीच म्हणावीशी वाटली की तुम्हाला असं बघून फार छान वाटतंय..प्रोत्साहनासाठी ते म्हटले असावे असं मला वाटलं..'


पुढे तिने म्हटलं की, 'त्यानंतर झी चं award मला मिळालं आणि I was happily shocked..निघताना माझी पुन्हा त्यांच्याशी भेट झाली आणि ते म्हणाले " तू एवढी का shocked होतीस? आम्हाला genuinely तुझं काम आवडलं होतं.." खरं सांगतेय..त्यांच्यासारख्या actor कडून मला हे ऐकायला मिळालं आणि मग विश्वास बसला की ok, ही trophy खरंच माझी आहे...माझी त्यांच्यासोबतची आठवण ही शेवटची आठवण ठरेल असं अजिबात वाटलं नव्हतं...This is not just a memory it’s a treasure for me! Will miss you sir!' 






ही बातमी वाचा : 


Atul Parchure Death : 'अलविदा अतुल...,' अतुल परचुरेंसोबतचे किस्से केले शेअर; किरण मानेंची भावुक पोस्ट