मुंबई : बॉलिवूडचा शहेनशाह आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगमध्ये त्यांना भविष्यात अंधत्व येण्याची शक्यता वर्तवली आहे. धूसर दिसणे, दोन प्रतिमा दिसणे या बाबी होत आहेत. पण डॉक्टरांनी मात्र डोळ्यासमोर स्क्रीन खूप वेळ धरल्यामुळे हे होत असल्याचं त्यांना सांगितलं आहे. तसंच त्यांना अंधत्व येणार नसल्याचेही स्पष्ट केलं आहे. तसेच ड्रॉप्स दिले आहेत हेही त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे


शुक्रवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहिला. त्यात गुड फ्रायडेच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या होत्या. काही जुन्या दिवसांच्या आठवणी होत्या. लिहिता लिहिता बिग बी पुढे जाऊ लागले तसे एका पॉईंट नंतर त्यांना कॉम्प्युटरवर दोन प्रतिमा दिसू लागल्या.समोरचं दृश्य धुसर दिसायला लागलं. त्याचवेळी भविष्यात आता आपण आंधळे होणार की काय अशी भीती व्यक्त केली. अर्थात त्यांच्या या ओळीने कुणाचाही ठोका चुकेल. कारण हे लिहिताना आधीच आपण अनेक इतर व्याधींनी ग्रस्त असल्याचंही त्यांनी यात नमूद केलं आहे.

Coronavirus | कोरोनाच्या लढ्यात अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात; एक लाख मजुरांना मदत


अशावेळी त्यांना आपल्या आईची देखील आठवण आली. माँ असं डोळ्याला काही झालं की साडीच्या पदराचा बोळा करून तोंडाने गरम करून तो डोळ्यावर लावी असंही म्हटलं. पुढे लगेच बिग बी यांनी आपल्या नॅपकिनचा बोळा केला आणि त्याने डोळा टिपला. अर्थात त्यांच्या डोळ्याला आराम मिळाला. आणि पुन्हा त्यांना स्वच्छ दिसू लागलं. अर्थत त्याच ब्लॉगमध्ये त्यांनी हे नमूद केलं आहे.

दरम्यान त्यांनी डॉक्टरना फोन केला. डॉक्टरनी त्यांचं सगळं ऐकून घेतलं. त्यांना डोळ्यात घालायला ड्रॉप दिले. आणि तुम्ही काही आंधळे होणार नाही आहात असंही सांगितलं.
आता मुद्दा असा की अमिताभ बच्चन यांना अचानक असं धूसर का दिसू लागलं? तर नीट वाचा पुढचा भाग.

PHOTO : पत्नी जयासह अमिताभ बच्चन यांनी केलं कतरिना कैफचं कन्यादान; अनेक दिग्गजांनी केली 


बिग बी आपला बराच वेळ कॉम्प्युटर स्क्रीनवर घालवतात. सतत ट्विटर, इंस्टा आणि ब्लॉगवर असतात. अनेक गोष्टी पहात असतात. सततच्या कॉम्प्युटरसमोर बसण्याने, सतत स्क्रीनवर असण्याने डोळ्यांना ताण आल्याचं डॉक्टर त्यांना म्हणाले. अमिताभ यांनाही ते मान्य कराव लागलं असणारच. आता दर तासाला ड्रॉप टाकण्याची जबाबदारी बिग बी वर आली आहे.
यातून आपण काय बोध घ्यायचा?

लोकडाऊनमध्ये सतत स्क्रीनवर न राहणं उत्तम. डोळ्यांची काळजी घ्यायला हवीच ना? जिथे त्या स्क्रीनने साक्षात बिग बीला नाही सोडलं तिथे आपली बात ती काय?