Amitabh Bachchan Tweets Create Political Tussle : बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. अमिताभ बच्चन हे आपल्या ट्वीटच्या क्रमांकावरून सजग असतात. एखाद्या ट्वीटचा क्रमांक चुकल्यास चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त अमिताभ दुरुस्ती करत सुधारीत ट्वीट क्रमांक सांगतात. आता, अमिताभ बच्चन यांच्या एका ट्वीटवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर रंगले आहे.
अमिताभ बच्चन यांचे ट्वीट काय?
अमिताभ बच्चन हे आपल्या ट्वीटर अकाउंटवर आपले नवे प्रोजेक्ट्सशिवाय एखादी नवीन माहिती, त्यांना आलेले अनुभव शेअर करत असतात. अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी एक ट्वीट केले.अमिताभ एका कामा निमित्त दक्षिण मुंबईत आले असताना त्यांनी कोस्टलरोडद्वारे मरीनड्राइव्ह ते जुहू प्रवास 30 मिनिटात केला.
त्यावर व्यक्त होताना वाह ! क्या बात है ! साफ सुथरी, नयी बढिया सडक कोई रुकावट नही.. याबाबत त्यांनी 'X' वर पोस्ट केली.
काही दिवसांपूर्वींदेखील अमिताभ यांनी दक्षिण मुंबईहून घरी जाताना कोस्टल रोडचा वापर केला होता. त्याचा व्हिडीओही पोस्ट केला होता.
कोस्टल रोडवरून राजकीय श्रेयवादाची लढाई
अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या ट्वीटला भाजप महाराष्ट्रकडून आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है…असे म्हणत अमिताभ यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होत असल्याचा दावा केला.
आदित्य ठाकरेंनी भाजपचा दावा खोडला...
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपचा दावा खोडून काढताना कोस्टल रोडच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम सांगितला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोस्टल रोडचं काम किती वेगाने सुरू होतं हे सांगतानाभाजपचं यात काही योगदान नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केले. आदित्य यांनी त्यावेळेसचे फोटोही पोस्ट करताना कोस्टल रोडसाठी काय काय उपाययोजना, यंत्रणा उभी केली याची माहिती 'X'वर पोस्ट केली.
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टनंतर भाजपकडून कोस्टल रोडचं श्रेय घेतलं जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी बच्चन यांना टॅग करत पोस्ट केली. त्यामुळे कोस्टल रोडच्या श्रेयवादावरून भाजप विरूद्ध आदित्य ठाकरेंमध्ये सध्या राजकीय सामना रंगल्याचे पहायला मिळत आहे.