Amey Wagh : अमेय वाघ (Amey Wagh) हा लवकरच 'लाईक्स आणि सबस्क्राईब' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील अमेयच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना बराच संभ्रम आहे. पण असं असलं तरीही सध्या त्याच्या एका गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अमेयसोबत गौतमी पाटीलही दिसतेय. लिंबू फिरवलं असं या गाण्याचं नाव असून सोशल मीडियावरही हे गाणं तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय. 


दरम्यान एबीपी माझासाोबत संवाद साधताना अमेयने एक खास इच्छा व्यक्त केली आहे. इकतच नव्हे तर त्याने ही इच्छा गौतमी जवळच सांगितली आहे. अमेयला गौतमीचा लाईव्ह कार्यक्रम पाहायचा असून त्याने गौतमीला देखील याविषयी सांगितलं आहे. तसेच त्याने गौतमीच्या कामाचंही भरभरुन कौतुक केलं. 


गौतमीचा कार्यक्रम पाहण्याची अमेयची इच्छा


गाण्याच्या शूटनंतर गौतमीकडून तिच्या कार्यक्रमांचं काही आमंत्रण वैगरे आलं का? यावर बोलताना अमेय वाघने म्हटलं की, मीच तिला शुटींगच्या वेळी म्हटलं की, मला तुझे कार्यक्रम पाहायला यायचं आहे. कारण मी ते सगळे व्हिडीओ पाहिले आहेत. ते वातावरण खूप भारी असतं. सगळे फॅन्स कुठून कुठून आलेले असतात. कोण छतावर बसलं असतं, कोण झाडावर बसलेलं असतं. त्यामुळे एकदा मी जाईन तिचा शो बघायला. 


गौतमीसोबत काम करण्याचा अनुभव


गौतमीसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी बोलताना अमेयने म्हटलं की, 'गौतमीसोबत काम करण्याचा अनुभव फार छान होता. ती तिच्या कामाच्या बाबतीत अत्यंत प्रोफेशनल आहे. डान्स तर तिला अवगत असलेली कला आहे, ती त्यामध्ये पारंगत आहे.  मी दोन ते तीन वेळी सराव केला होता. पण तरीही मला विश्वास नव्हता. कारण मला तीन ते साडेतीन मिनिटांच्या स्टेप्स लक्षात नाही राहत. मला जास्तीत जास्त 10 सेकंदाच्या स्टेप्स लक्षात राहतात. पण ती एक दिवस आली तिने सराव केला आणि दोन दिवस गाण्याचं शूट होतं, ती पटापट सगळ्या स्टेप्स करत होती. त्यामध्ये जे काही रिटेक झाले असतील ते माझ्यामुळेच झाले असतील. पण ती त्यामध्ये अत्यंत परांगत आहे. तसंच त्या गाण्याचा गौतमीच्या प्रसिद्धीचाही खूप फायदा झाला. दोन ते तीन दिवसांत त्या गाण्याला 8 ते 10 लाख व्ह्युज आले होते.' 


ही बातमी वाचा : 


Sai Tamhankar : 'मी स्थिरावणारी व्यक्ती नाही, पण पुढच्या 6-7 महिन्यांत...', ब्रेकअपच्या चर्चांनंतर सईच्या वक्तव्याने वेधलं लक्ष