Ameesha Patel : अहान पांडेची डेब्यू फिल्म 'सैयारा'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असताना आता चाहत्यांकडून त्याची तुलना ऋतिक रोशनसोबत केली जात आहे. अभिनेता ऋतिक रोशन याने 2000 मध्ये ‘कहो ना… प्यार है’ या सिनेमातून एकाच रात्रीत स्टारडम मिळवली होती. 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केलेल्या 'सैयारा' या चित्रपटाची तुलना सोशल मीडियावर ‘कहो ना… प्यार है’सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांशी केली जात आहे. कारण दोन्ही चित्रपटांतून संबंधित कलाकार एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.
अलीकडेच ‘Ask Me Anything’ या सेशनदरम्यान अमीषा पटेल यांना जेव्हा अहान पांडेची ऋतिक रोशनसोबत तुलना केल्याबाबत विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी थोडी खिल्ली उडवत काहीसं असं उत्तर दिलं की सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.
अमीषा पटेल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. अलीकडेच त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचा ट्विटर)वर ‘Ask Me Anything’ सेशन घेतलं, त्यात 'सैयारा' चित्रपटाविषयी विचारणा झाली. खरंतर अमीषा पटेलला जेव्हा अहान आणि ऋतिक यांच्यातील तुलना विचारली गेली, तेव्हा त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली. अमिषा म्हणाल्या की, मी अजून सैयारा चित्रपट पाहिला नाही, पण त्यांनी अहानला शुभेच्छा दिल्या. मात्र, त्याच वेळी एक थेट आणि तिरकस विधान केलं – "बाप तो बाप होता है और बेटा तो बेटा!"
‘बाप तो बाप होता है आणि बेटा तो बेटा’
अमीषा म्हणाल्या, "मी हा चित्रपट पाहिलेला नाही, पण मी त्याला शुभेच्छा देते. अहान एक अत्यंत प्रतिभावान अभिनेता आहे. पण 'बाप तो बाप होता है आणि बेटा तो बेटा'. अमिषा पटेलचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण यात अमीषाने ऋतिकची स्तुती करतानाच अहानवर टीका देखील केली आहे.
यापूर्वी अमीषाला मुंबईत पॅपराझींनी विचारलं होतं, जेव्हा सैयाराची तुलना ‘कहो ना… प्यार है’शी केली गेली. त्यावेळी अमीषा म्हणाल्या होत्या –"सर्वप्रथम, मी या दोघा नवोदित कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि आशा करते की ते बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करतील. पण खरे सांगायचे तर मी हा चित्रपट पाहिलेला नाही, आणि माझ्या कोणत्याही मित्रानेही पाहिलेला नाही. त्यामुळे मी चित्रपटावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण हो, ही तुलना मीही पाहत आहे. सोशल मीडियावर आणि PR टीम्सनी रिलीजपूर्वीच याची तुलना ‘कहो ना… प्यार है’सोबत केली आहे."अमिषा म्हणाली, "25 वर्षे लागली, पण निदान कोणाचीतरी डेब्यू फिल्म आमच्या 'कल्ट' सिनेमाशी तुलना केली जात आहे, हीच मोठी गोष्ट आहे."
‘सैयारा’ हा एक रोमँटिक-ड्रामा प्रकारातील चित्रपट आहे, ज्यामध्ये अहान पांडेने 'कृष कपूर' या एक होऊ घातलेल्या गायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं संगीत, प्रेमकथा आणि कलाकारांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. त्यामुळे या चित्रपटाचे संवाद आणि गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : साई पल्लवीचा 'अप्सरा आली'वर जबरदस्त लावणी डान्स, सोशल मीडियावर धुमाकूळ
VIDEO : जेव्हा प्रमोद महाजन यांच्या लेकीने सिनेमात साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका