Sai Pallavi Lavani dance video : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हिने 'अप्सरा आली' या लावणीवर (Sai Pallavi Lavani dance video) जबरदस्त डान्स केलाय. तिच्या डान्सचा व्हिडीओ (Sai Pallavi Lavani dance video) सोशल मीडियावर व्हायरल झालाय. साई पल्लवीची डान्सर म्हणून देखील ओळख आहे. तिने (Sai Pallavi Lavani dance video) महाराष्ट्रीयन डान्स पद्धत असलेल्या लावणीवर डान्स करत आपल्या हजारो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या या डान्स व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
अभिनेत्री साई पल्लवी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. ‘नेचरल ब्यूटी’ या नावाने प्रसिद्ध असलेली साई पल्लवी ही डॉक्टरसुद्धा आहे. मात्र तिने अभिनय क्षेत्रातच आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला. चला जाणून घेऊया तिच्याविषयी काही रंजक गोष्टी...
साई पल्लवीचा जन्म आणि शिक्षण
साई पल्लवीचा जन्म 9 मे 1992 रोजी तामिळनाडूच्या कोटागिरी येथे बडगा समुदायात झाला. तिच्या वडिलांचं नाव सेंथमारई कन्नन आणि आईचं नाव राधा कन्नन आहे. तिची धाकटी बहीण पूजा कन्नन हीसुद्धा अभिनेत्री आहे. साईने आपलं शालेय शिक्षण कोयंबटूरमधील एविला कॉन्व्हेंट स्कूलमधून पूर्ण केलं आणि 2016 मध्ये तिने जॉर्जियामधील त्बिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएस पदवी मिळवली. मात्र, डॉक्टर म्हणून नोंदणी न करता तिने अभिनयालाच करिअर म्हणून निवडलं.
साई पल्लवीचा साधेपणा हिची तिची ओळख
साई तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. काही काळापूर्वी तिच्या बहिणीच्या लग्नात ती सहभागी झाली होती, जिथे तिने नृत्यही केले. तिच्या साधेपणाचं तिथे खूप कौतुक झालं. यावेळी ती भावूकही झाली होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या डेटिंगच्या अफवा देखील चर्चेत होत्या, ज्यात सांगितलं गेलं की ती एका विवाहित अभिनेत्याला डेट करत होती, पण साईने यावर कधीच अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. ती सोशल मीडियावर निसर्गाशी संबंधित फोटो शेअर करत असते आणि अध्यात्माकडे तिचा कल आहे.
साई पल्लवीचं करियर
साई पल्लवी ही एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री आणि डान्सर आहे, जी तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करते. तिने 2015 मध्ये मल्याळम चित्रपट प्रेमम मधून पदार्पण केलं आणि तिच्या अभिनयाचं भरपूर कौतुक झालं. त्यानंतर फिदा आणि काली या चित्रपटांमधील भूमिकांमुळे तिला दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तिचा अलीकडील चित्रपट अमरन बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून त्याने ३०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. तिचा चित्रपट थंडेल 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला, ज्यात ती नागा चैतन्यसोबत दिसली. नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण चित्रपटात साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे.
सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी
साई लवकरच नितेश तिवारी यांच्या रामायण या चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम आणि यश रावणच्या भूमिकेत असतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामायणचा पहिला भाग 2027 मध्ये प्रदर्शित होणार असून दुसरा भाग त्याच वर्षी नंतर येईल. साईची अंदाजे संपत्ती सुमारे 29 कोटी रुपये आहे आणि ती चित्रपटांव्यतिरिक्त जाहिरातींमधूनही कमाई करते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : जेव्हा प्रमोद महाजन यांच्या लेकीने सिनेमात साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका
