Amazon Buying OTT Platform : अनेक सुपरहिट वेब सीरिजचे स्ट्रिमिंग करणारा ओटीटी प्लॅटफॉर्म दिग्गज कंपनी ॲमेझॉन (Amazon) खरेदी करणार आहे. मागील एक वर्षापासून या ओटीटी प्लॅटफॉर्मची विक्री होणार असल्याची चर्चा होती. अखेर आता याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. दोन कंपन्यांमधील डील फायनल झाल्याचे वृत्त आहे. ॲमेझॉन खरेदी करणार असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म हा एमएक्स प्लेअर (MX Player) आहे. एमएक्स प्लेअर हा ओटीटी प्लॅटफॉर्म टाइम्स इंटरनेट (Time Internet) कंपनीच्या मालकीचा आहे. 


'मिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, एक वर्षापूर्वी टाइम्स इंटरनेट आणि ॲमेझॉन प्राईममध्ये चर्चा सुरू होती. मात्र, दोन्ही कंपन्यांमध्ये परस्पर सहमती तयार न झाल्याने या डीलची चर्चा मध्येच थांबवण्यात आली होती.


एक वर्षापूर्व टाइम्स इंटरनेटने एमएक्स प्लेअरसाठी 830 कोटींची मागणी केली होती. तर, ॲमेझॉन ने 500 कोटींमध्ये करार करण्याची तयारी दर्शवली होती. 


मागील एक वर्षात एमएक्स प्लेअरची अवस्था आणखी बिकट झाली. कर्जाचा बोझा वाढत गेल्याने एमएक्स प्लेअरचे मूल्य एक वर्षाच्या आधीपेक्षाही कमी झाले. समोर आलेल्या माहितीनुसार, एमएक्स प्लेअर हे 2500 कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. 


आता, समोर आलेल्या एका वृत्तानुसार दोन्ही कंपन्यांमध्ये डील पक्की झाली आहे. एमएक्स प्लेअरचे कर्ज आपल्या माथी घेणार नसल्याचे ॲमेझॉन ने स्पष्ट केले आहे. एमएक्स प्लेअरवरील कर्जाची परतफेड टाइम्स इंटरनेटच करणार आहे. या डीलनंतर एमएक्स प्लेअरचे सीनियर मॅनेजमेंट ॲमेझॉन मध्ये सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.


inc42.com नुसार, टाइम्स इंटरनेट मागील काही काळापासून आपल्या संपत्तीची विक्री करत आहे. मागील वर्षी टाइम्स इंटरनेटने  MX Takatak, Dineout, MensXP, iDiva and Hypp या अॅपची विक्री करण्यात आली. 


inc42.com च्या वृत्तानुसार, ॲमेझॉन ने 100 दशलक्ष डॉलरहून अधिक रुपयांमध्ये ही डील करण्यात आली आहे. 


>> एमएक्स प्लेअरबाबत...


> एका दक्षिण कोरियाई कंपनीने मीडिया प्लेअर अॅप म्हणून एमएक्स प्लेअरला लाँच केले होते. 


> टाइम्स इंटरनेटने वर्ष 2018 मध्ये 1000 कोटींनी या अॅपची खरेदी केली. 


> टाइम्स इंटरनेटने या प्लॅटफॉर्मला  ad-supported streaming service साठी पु्न्हा लाँच केले. 


> आपल्याकडे 300 दशलक्षहून अधिक युजर्स असल्याचा दावा एमएक्स प्लेअरने केला आहे. 


इतर महत्त्वाची बातमी :