Horoscope Today 22 December 2024 : आजचा वार रविवार असल्या कारणाने अनेक राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...


मकर रास (Capricorn Today Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल. आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात. तसेच, लवकरच धार्मिक यात्रेला देखील जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे.  


कुंभ रास (Aquarius Today Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चढ-उतार पाहायला मिळू शकतात. अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने मुलांसाठी हा काळ एकदम आनंदाचा असणार आहे. 


मीन रास (Pisces Today Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. आज तुम्हाला अचानक सरप्राईज भेट म्हणून मिळू शकते. तसेच, कुटुंबात थोडेसे वादविवाद होऊ शकतात. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा वाद वाढू शकतात. तसेच, तुमचे बाहेर फिरण्याचे योग लवकरच जुळून येणार आहेत. आरोग्याची काळजी घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:            


Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य