Pushpa The Rise : 'पुष्पा : द राईस' (Pushpa The Rise) या सुपरहिट चित्रपटाने सर्वांना वेड लावले. यामध्येच 'पुष्पा'स्टार अल्लु अर्जुनच्या (Allu Arjun) चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आपले त्याच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चढाओढ सुरू असते. यामध्ये भर पडली आहे मुंबईतील प्रसिद्ध बंटी ज्यूस सेंटरची. बंटी ज्यूस सेंटरचा चालक असलेला बंटी, अल्लू अर्जुनाचा खूप मोठा चाहता असून त्याने आपल्या ज्यूस सेंटरमध्ये अल्लू अर्जुनच्या नावाने विविध पेय सादर केली आहेत. अल्लू अर्जुनचे डायलॉग आणि फोटो असलेल्या विशेष ग्लासमध्ये हे ज्यूस सर्व्ह करण्यात येत असून त्यावर ग्राहकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


पाहा व्हिडीओ : 






अल्लू अर्जुनवर असलेले आपले प्रेम अशा प्रकारे दर्शविण्याचे कारण विचारले असता बंटी ज्यूस सेंटरचे बंटी म्हणाले की, "अल्लू अर्जुन सरांच्या पहिल्या चित्रपटापासूनच मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मला त्यांचे सगळे डायलॉग आवडतात पण 'पुष्पा' मधील "फायर है मी झुकेगा नाही" हा डायलॉग माझा आवडता आहे. 


'पुष्पा' चित्रपट देशभर हिट झाल्यानंतर, अल्लू अर्जुनची लोकप्रियता आणि स्टारडमने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. इतकेच नाही तर, पुष्पाचा चित्रपटातील लूक यावर्षीच्या गणेशोत्सवातही पाहायला मिळला. अनेक ठिकाणी पुष्पा स्टाईलच्या गणेशमूर्ती पाहायला मिळाल्या. अल्लू अर्जुनच्या फॅन क्लबने गणपतीच्या मूर्तींची छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर केले होते. जिथे गणपती बाप्पांना 'पुष्पा'सारख्या पांढऱ्या कुर्ता-पायजम्यामध्ये पाहायला मिळाले. तसेच, 'पुष्पा'मधील ब्लॉकबस्टर गाणी सामी सामी आणि श्रीवल्ली यांनी नवरात्रीदरम्यान आपले वर्चस्व चांगलेच गाजवले. दिवाळीतही सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चेहरा असलेले फटाके देशभर विकले गेले. 


अलीकडेच, पुष्पाच्या दुसर्‍या भागाची घोषणा झाली असून, अल्लू अर्जुनचे चाहते त्याला पुन्हा एकदा 'पुष्पा'च्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत.


महत्वाच्या बातम्या : 


Happy Birthday Ananya Panday : वयाच्या 24 व्या वर्षी अनन्या पांडे आहे कोट्यावधींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते 'इतकी' फी