मुंबई : केरळमधील (Kerala) वायनाडमध्ये भूस्खलनामुळे (Wayanad Landslide) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नैसर्गित आपत्तीमुळे आतापर्यंत 308 जणांना जीव गमवावा लागला असून शेकडो जण अजूनही बेपत्ता आहेत. साउथ स्टार्स नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन, मोहनलाल यांनी आपत्तीग्रस्तांसाठी लाखो रुपयांची देणगी दिली होती. आता अभिनेता अल्लू अर्जुननेही आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी 25 लाखांची मदत केली आहे. 30 जुलै रोजी चुरलमला आणि मुंडक्काई येथे भूस्खलन झालं. अभिनेता अल्लू अर्जुनने (Allu Arjun) पीडितांना मदत करत त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली आहे.


केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी अल्लू अर्जुनचा मदतीचा हात


अल्लू अर्जुनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून भूस्खलनाच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अल्लू अर्जुनने लिहिलं आहे की, 'वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मला खूप दु:ख झालं आहे. केरळने मला नेहमीच खूप प्रेम दिलं आहे आणि मला पुन्हा 25 लाख रुपये केरळच्या सीएम रिलीफ फंडात पुनर्निर्माणासाठी दान करून योगदान द्यायचं आहे. तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि सामर्थ्यासाठी प्रार्थना.'


वायनाड आपत्तीग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांचा निधी






अभिनेता मोहनलाल यांच्याकडून तीन कोटींची मदत


यापूर्वी साऊथ स्टार मोहनलालनेही तीन कोटींची मदत केली होती. बाधित भागाला भेट देऊन त्याची झलक सोशल मीडियावरही दाखवली.






नयनतारा-विघ्नेश यांच्याकडूनही मदत


'जवान' अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांनी मदत निधीसाठी 20 लाख रुपयांची देणगी दिली होती. वायनाडमध्ये सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 30 जुलै रोजी चुरलमला आणि मुंडक्काई येथे भूस्खलन झाल्याची माहिती आहे. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


सॅल्यूट ! दुर्घटनाग्रस्त वायनाडमध्ये वाहत्या नदीवर पूल बनवतेय महाराष्ट्राची लेक; सैन्यातील 'मेजर'चा अभिमान