Alka Kubal On Maherachi Sadi Marathi Movie: मराठीतल्या (Marathi Film) गाजलेल्या सिनेमांची नावं घेतली जातात, त्यावेळी 'माहेरची साडी' (Maherachi Sadi) या सिनेमाच्या नावाचा आवर्जुन समावेश केला जातो. नव्वदच्या दशकात आलेल्या 'माहेरच्या साडी' सिनेमानं लोकप्रियतेचा आणि कमाईचा उच्चांक गाठलेला. पण, अलका कुबल (Alka Kubal) यांनाही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलेलं.  पण, तुम्हाला माहितीय का? मराठीतल्या (Marathi Movie) या सुपरहिट सिनेमासाठी अलका कुबल कधीच पहिली पसंत नव्हत्या. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना त्यांनी स्वतः यासंदर्भात खुलासा केला आहे. 

Continues below advertisement

नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अलका कुबल यांनी 'माहेरची साडी' सिनेमावेळीचा एक किस्सा सांगितला. अलका कुबल म्हणाल्या, "विजयजींना सिनेमात मला घ्यायचं नव्हतंच कारण मी आधी सिनेमे केले होते. त्यांना नवीन नायिका हवी होती. किंवा भाग्यश्री पटवर्धन हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांनी प्रयत्नही केला होता. पितांबर काळे आणि एन एस वैद्य त्यांना सांगत होते की, तुम्ही एकदा अलकाला भेटा, अलकाला घ्या, असं ते सांगत होते. विजयजींना नवीन चेहरा हवा होता. नवीन मुलींचे ऑडिशन्सही सुरू होते. मला तेही समजलं होतं. पण, त्यांच्या सांगण्यामुळे विजयजींनी मला भेटायला बोलवलं. पण मी त्यावेळी चौपट मानधन घेत होते. मला माहेरची साडीसाठी चार पटीनं कमी मानधन मिळत होतं. मी त्यांना म्हटलं विजयजी मला नाही जमणार... आणि मी तिथून निघाले..." 

"मला पितांबर काळेंनी थांबवलं. म्हणाले अलका तू हा मूर्खपणा करतेस... खूप मोठी चूक करतेस... हा सिनेमा खूप वेगळ्या पद्धतीनं होणारे आणि हा तुझ्यासाठी टर्निंग पॉइंट असणारे... माहीत नाही पण त्यांना तो कॉन्फिडन्स होता. जसा विजयजींना होता, तसाच पितांबर काळेंना होता... कारण ते रोज एकत्र बसून काम करायचे. माझी विजयजींची पहिलीच ओळख होती. आणि खरंच मी पितांबर काळेंच्या शब्दाखातर आत आले आणि मी तो साइन केला. आणि मग फोटोशूट झालं आणि शूटला सुरुवात झाली...", असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sachin Pilgaonkars Statement On Rajkumar Barjatya: 'माझं गाणं ऐकलं अन् राजकुमार बडजात्यांनी अखेरचा श्वास घेतला...; सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा, नेटकरी म्हणाले...