Alia Bhatt Daughter Name : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच चिमुकलीचं आगमन झालं. या लहान बाळाच्या जन्मापासूनच चाहत्यांमध्ये बाळाच्या नावावरून उत्सुकता होती. अखेर आलियाच्या मुलीचे नाव जाहीर करण्यात आले आहे. आलिया-रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव राहा (Raha) असे ठेवले आहे. हे नाव आजी नीतू कपूरच्या पसंतीने ठेवण्यात आले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आपल्या मुलीचे नाव सांगितलेच नाही तर त्या नावाचा अर्थही सांगितला आहे.     


आलिया भट्टने शेअर केलेल्या फोटोमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि त्यांची लहान मुलगी यांचा एकत्र फोटो आहे. तसेच, या फोटोमध्ये राहाच्या नावाची जर्सी भिंतीवर दिसत आहे. हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत आलिया भट्टने एक गोंडस कॅप्शनदेखील लिहिले आहे.






आलिया भट्ट लिहिते की, "आमच्या मुलीचे राहा हे नाव तिच्या आजीने निवडले आहे, या नावाचा इतका सुंदर अर्थ आहे. राहा म्हणजे एक दैवी मार्ग, स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद, संस्कृतमध्ये याचा अर्थ गोत्र... बंगालीमध्ये याचा अर्थ विश्रांती, अरबी भाषेत याचा अर्थ शांती, आनंद, स्वातंत्र्य." अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये आलियाने राहा नावाचा अर्थ सांगितला आहे. 


चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद


आलिया भट्टने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच अवघ्या काही मिनिटांतच यूजर्सकडून प्रतिसाद यायला सुरुवात झाली. प्रत्येकजण 'राहा' या नावावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. केवळ प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीही या पोस्टवर आनंदाचा वर्षाव करतायत. तसेच, रिद्धीमा कपूरपासून अनेक सेलिब्रिटीही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.   


महत्वाच्या बातम्या : 


Alia-Ranbir Baby Girl : आलिया-रणबीर आई-बाबा झाल्यानंतर चाहत्यांचाही आनंद गगनात मावेना; चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव