Akshay Kumar Shares Hilarious Story About Wife Twinkle Khanna: अभिनेता अक्षय कुमार 'द व्हील ऑफ फॉर्च्यून' या नवीन रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोचा पहिला भाग अत्यंत मनोरंजक असणार आहे.  ज्यामध्ये खास पाहुणे  रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख  आणि श्रेयस तळपदे हे  मजेदार खेळ खेळतील. या खेळाचा एक प्रोमो देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या  प्रोमोमध्ये अक्षय कुमारने त्याची पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला आहे.  

Continues below advertisement

अक्षय कुमारने ट्विंकल खन्ना रागावल्यावर नेमकं काय करते? याबाबत सांगितले..

प्रोमोच्या सुरुवातीला, अक्षय कुमार रितेशला विचारतो, 'तुझ्या लग्नाला किती वर्षे झाली आहेत?'. रितेश म्हणतो, 'जेनेलियाला 10 वर्षांपासून  डेट करत होता.  लग्नाला एकूण  14 वर्ष पूर्ण झाली आहेत'. त्यानंतर अक्षय कुमार म्हणतो, आमच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि ते पत्नीची माफी कशी मागायची, याचे मोफत सल्ले देतात. जेनेलिया मस्करीत,  सॉरी देशमुख असं म्हणते. त्यानंतर अक्षयने ट्विंकल खन्नाबद्दल एक मजेशीर किस्सा शेअर केला. तो म्हणाला, "माझी बायको थोडी वेगळी आहे.  जेव्हा माझी बायको रागावते, तेव्हा मला कळतं की तेव्हा नेमकं काय होते.  कारण जेव्हा मी झोपायला जातो, तेव्हा माझ्या बेडची एक बाजू असते. त्यावर पाणी ओतले गेले असते", हा किस्सा ऐकून रितेश आणि जेनेलिया जोरात हसतात. 

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 17 जानेवारी 2001 रोजी एका खासगी समारंभात विवाह केला होता. ज्यामध्ये केवळ जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते.  त्यांना एकूण दोन मुले आहेत.  हे  जोडपं बऱ्याचदा सोशल मीडियावर मजेदार फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. 

Continues below advertisement

अक्षय कुमारचा नवीन रिअॅलिटी शो, द व्हिल ऑफ फॉर्च्यून 27 जानेवारीपासून  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  हा शो 9 वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर प्रदर्शित होत आहे.  अक्षय लवकरच प्रियदर्शन दिग्दर्शित भूत बंगला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात परेश रावल आणि वामिका गब्बी देखील प्रमुख भूमिकांमध्ये  आहेत. अक्षय कुमार लवकरच वेलकम टू जंगल आणि हैवान या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक त्याच्या आगामी चित्रपटांसाठी उत्सुक आहेत.