Akshay Kumar Taking Interview CM Devendra Fadnavis: काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) मुलाखत घेतल्यानंतर आता बॉलिवूडचा (Bollywood News) खिलाडी अक्षय कुमारनं (Akshay Kumar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेतली. 'महाराष्ट्र आणि सिनेमा - भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भविष्य' घडवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी अक्षय कुमारनं जो पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारलेला, तोच देवेंद्र फडणवीसांना विचारला. अक्षय कुमारनं ज्यावेळी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतलेली, त्यावेळी तुम्ही आंबा कसा खाता? असा प्रश्न विचारलेला, त्यावेळी अक्षयला खूप ट्रोल करण्यात आलेलं. अशातच आता अक्षय कुमारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही नागपुरचे आहात, तुम्ही संत्री कशी खाता? असा प्रश्न विचारला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं पाहूयात सविस्तर... 

Continues below advertisement

अक्षय कुमारनं मुलाखतीला सुरुवात करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं की, मी पंतप्रधान मोदींना आंबा कसा खायला आवडतो, असं विचारलं... त्यावेळी लोकांनी माझी खूप खिल्ली उडवली... पण तरी मी सुधारणार नाही... तुम्ही नागपूरचे आहात... मी तुम्हाला विचारणार आहे की, तुम्ही संत्री कशी खायला आवडतात...?

अक्षयच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस सर्वात आधी खळखळून हसले, त्यानंतर म्हणाले की, "मी तुम्हाला एक नवी पद्धत सांगतो... संत्री असतात ना, त्यांची साल न काढता, त्याचे दोन भाग करा, त्याची साल अजिबात काढू नका... आणि त्यावर मीठ घालून खा... जसा आंबा खाता तसंच ते संत्र खा... तुम्हाला खरंच एक वेगळीच फिलींग येईल संत्री खाताना... ही पद्धत फक्त नागपुरच्याच लोकांना माहीत आहे...."

Continues below advertisement

दरम्यान, 2019 साली अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अराजकीय मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची त्यावेळी देशभरात चर्चा झालेली. मुलाखतीत अक्षयने नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारले होते. पण एका प्रश्नावरून अक्षयवर बरीच टीका झाली होती. तुम्ही आंबे कसे खाता, कापून की चोखून? असा प्रश्न अक्षय मोदींना विचारलेला.  एका प्रश्नावरून अक्षयवर बरीच टीका झाली होती. अगदी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी यावरून टीका केली होती. नेटकऱ्यांनी देखील अक्षय कुमारची चांगलीच खिल्ली उडवली होती.

पाहा व्हिडीओ : अक्षयनं विचारलं तुम्हाला संत्री कशी खायला आवडतात, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली नवी पद्धत...

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर 'महाराष्ट्र' सिनेमात पहिला सीन कोणता असेल? अक्षयचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांचं अभिमानास्पद उत्तर!