मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आईची अरूणा भाटिया यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय कुमारच्या आईला मुंबईच्या पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आईची प्रकृती ठीक नसल्याने अक्षय कुमार आईच्या देखभाली सोमवारी चित्रपटाचे शूटिंग अर्धवट सोडून मुंबईला आला आहे. अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट सिंड्रेलाचे शुटिंग लंडन येथे करत होता. एका विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आईची काळजी घेण्यासाठी अक्षय कुमारने चित्रपट निर्मात वाशु भगनानी यांची परवानगी घेतली आहे. अक्षय कुमारच्या अनुपस्थित देखील चित्रपट सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार कोण? अक्षय, रणबीर, रणवीर की सलमान यांच्यात चुरस
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच राम सेतु चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर अक्षयला हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
अक्षय कुमारच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बेलबॉटम चित्रपट ऑनलाईन लीक झाला होता. विशेष म्हणजे पायरेटेड साइटवर स्पाय-थ्रिलर एचडी स्वरूपात उपलब्ध होता. कोरोना महामारी दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो ओटीटीवर रिलीज करण्याऐवजी बॉक्स ऑफिसवर रिलीज केला.पण आता या लीकच्या बातमीमुळे निर्मात्यांची चिंता आणखी वाढली आहे. नुकसान टाळण्यासाठी निर्माते या वेबसाइटवर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर अक्षय कुमार एका गुप्तचर एजंटची भूमिका साकारत आहे, ज्याचं कोडनेम 'बेल बॉटम' आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड नव्यानं उभं राहू पाहात आहे. गेल्या मार्चपासून बॉलिवूडला लागलेला ब्रेक आता सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. कारण, आता अनेक मोठ्या सिनेमांनी आपआपल्या सिनेमांच्या तारखा ठरवायला सुरूवात केली आहे. अक्षयकुमारचे अनेक मोठे सिनेमे या वर्षात रिलीज होण्याची शक्यता आहे.
ऐश्वर्या रायपासून अक्षय कुमारपर्यंत या बॉलीवूड सेलिब्रिटींनी सर्वात श्रीमंत घरात केलं लग्न
यात सूर्यवंशी हे दोन मोठे सिनेमे आहेतच. याशिवाय आणखी काही सिनेमांची नावं ही यात घ्यावी लागतील. त्यात समावेश होतो आतरंगी रे, रक्षाबंधन आणि पृथ्वीराज या सिनेमांचा समावेश होतो. यापैकी पृथ्वीराज या सिनेमाचं चित्रिकरण त्याने नुकतंच पूर्ण केलं. त्याच्या हातात असलेले हे सगळे मोठे सिनेमे मानले जातात.