Akshay Kumar Hilarious Reply: अक्षय कुमार (Akshay Kumar) देशातील टॉप-10 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्समध्ये आहे आणि त्याची एकूण संपत्ती सुमारे 2500 कोटी रुपये आहे. तो एका चित्रपटासाठी तब्बल 60 कोटी ते 145 कोटी रुपये घेतो. जेव्हा जेव्हा अक्षयचा कोणताही नवा चित्रपट येतो, तेव्हा त्याच्या मानधनाची चर्चा सर्वात आधी होते. बऱ्याच काळापासून अक्षय कुमारनं 'हाऊसफुल 5'साठी (Housefull 5) घेतलेल्या तगड्या फीची चर्चा होत होती. अशातच मंगळवारी जेव्हा ट्रेलर लाँच झाला, तेव्हा एका पत्रकारानं अक्षयला त्याच्या मानधनाबद्दल प्रश्न विचारला. अक्षयनं दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण हसून फुलून गेले.

Continues below advertisement


'हाऊसफुल 5' (Housefull 5 Trailer) च्या ट्रेलर लाँचच्या वेळी एका पत्रकारानं अक्षय कुमारला विचारलं की, 'हाऊसफुल 5'साठी तुम्ही साजिदजी (नाडियाडवाला) यांच्याकडून किती पैसे घेतलेत? आपल्या जबरदस्त विनोदबुद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारनं असं उत्तर दिलं की, ते ऐकून तुम्हीही लोटपोट होऊन जाल. 


अक्षयनं फीबाबत दिलेल्या प्रश्नावर दिलं मजेशीर उत्तर 


अक्षय कुमार म्हणाला की, "जर मी पैसे घेतले असतील तर मी तुम्हाला का सांगू? तू काय माझा भाचा लागतोस का की मी तुला सांगावं? मी पैसे घेतले. मी खूप पैसे घेतलेत. चित्रपट बनवला आहे, तो खूप चांगल्या बजेटमध्ये बनवला गेला. मला खूप मजा आली. आजचा दिवस आनंदाचा आहे. तुला रेड टाकायची आहे का?"


अक्षयच्या उत्तरानं सगळे हसून हसून लोटपोट, लोक म्हणाले, खिलाडीशी पंगा घेऊ नका 


अक्षय कुमारचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यावर युजर्सकडून अनेक कमेंट येत आहेत. ते अक्षयच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करत आहेत. व्हायरल इंस्टाग्राम व्हिडीओवर एकानं लिहिलंय की, "हाच अंदाज हवाय आपल्याला, मजा आणि मस्तीमध्ये अक्षय कुमार." दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, "खिलाडीशी पंगा घेऊ नका." एका युजरनं लिहिलंय की, "सेवेज रिप्लाई. अक्षय इज द बेस्ट." 






'हाऊसफुल 5' मध्ये कोण-कोण दिसणार? 


'हाऊसफुल 5' बद्दल बोलायचं झालं तर, तो 6 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 'हाऊसफुल 5' चा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अक्षय व्यतिरिक्त, या चित्रपटात अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, नर्गिस फाखरी, फरदीन खान आणि चित्रांगदा सिंह यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट तरुण मनसुखानी दिग्दर्शित करत आहे, तर साजिद नाडियाडवाला निर्माते आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या फ्लर्टिंगचे मेसेज व्हायरल करणाऱ्या प्राची पिसाटचा यूटर्न? आता म्हणते, मी तर....