Akshay Kumar Paan Masala Ad : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे (Akshay Kumar Paan Masala Ad) प्रचंड चर्चेत आला आहे. या जाहिरातीमुळे अक्षयला प्रचंड ट्रोल देखील करण्यात आले होते. त्यातच एकीकडे अक्षय पान मसालाच्या जाहिरातीत झळकला आणि दुसरीकडे अल्लू अर्जुनने अशाच एका जाहिरातीची ऑफर नाकारल्यामुळे या दोन्ही सुपरस्टार्सच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक घमासान झालं. मात्र, यानंतर आता अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांची माफी मागितली आहे.


अक्षय कुमारच्या या जाहिरातीमुळे त्याचे चाहते खूप नाराज झाले होते. अक्षयने समाजासाठी अहितकारक ठरणाऱ्या अशा जाहिराती स्वीकारू नयेत, अशी चाहत्यांची इच्छा होती. या पान मसाला जाहिरातीमुळे अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता.


माफी मागताना काय म्हणाला अक्षय?


सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर अक्षयने चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. काही दिवसांपासून तुमच्या प्रतिक्रियांचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. मी कधीही तंबाखूला प्रोत्साहन दिलं नाही आणि यापुढेही देणार नाही. विमल इलायचीच्या जाहिरातीवर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे अतिशय नम्रतेने मी यातून माघार घेत आहे. या जाहिरातीतून मिळालेला सगळा पैसा मी एका चांगल्या कामासाठी खर्च करेन. तथापि, माझ्या कराराची कायदेशीर मर्यादा पूर्ण होईपर्यंत हा ब्रँड भविष्यातही ही जाहिरात प्रसारित करत राहील. परंतु, मी तुम्हा सर्वांना वचन देतो की, मी माझी पुढील कामं काळजीपूर्वक निवडेन. आणि त्या बदल्यात, मी तुमचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासोबत कायम राहाव्यात, अशी इच्छा व्यक्त करतो.’


पाहा पोस्ट :



बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा मनोरंजन विश्वातील सर्वात शिस्तबद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र, पान मसालाची जाहिरात केल्यानंतर त्याच्यावर तुफान शेरेबाजी झाली. अक्षय कुमारसोबत या जाहिरातीत अभिनेता अजय देवगण आणि शाहरुख खान देखील झळकले होते.


संबंधित बातम्या