Bollywood 2025 Blockbuster Box Office Collection: 2025 हे बॉक्स ऑफिससाठी सुवर्ण वर्ष ठरलं. साउथ ते बॉलिवूड कंटेंट, स्टारडम आणि प्रेक्षकांच्या उत्साहाने कमाईचे नवे रेकॉर्ड मोडले. पण या वर्षात सर्वात मोठा सरप्राइज पॅकेज ठरला अक्षय खन्ना.(Akshay Khanna) वर्षभरात केवळ 2 चित्रपट दिले पण ते इतके हिट ठरले की बॉक्स ऑफिस कमाईत तो या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला. सर्वांना मागे टाकून तोपहिल्या क्रमांकावर पोहोचला. पाहूयात 2025 मध्ये कुठल्या कलाकारांनी  किती कमाई केली. कोण ठरले यंदाचे टॉप कलाकार? 

Continues below advertisement

1. अक्षय खन्ना : खलनायकी अंदाजात 1000 कोटींची दणक्यात कमाई

2025 मध्ये अक्षय खन्नाने अक्षरशः बॉक्स ऑफिसवर वादळ उठवलं. त्यांच्या ‘छावा’ आणि ‘धुरंधर’ या दोन चित्रपटांनी वर्षभर चर्चा रंगली. खलनायकी अंदाजात असलेल्या या दोन्ही भूमिकांमुळे अक्षय खन्नाने प्रचंड लोकप्रीयतेसह या दोन चित्रपटांमधून तब्बल 1000 कोटींहून अधिक कमाई अक्षयने केलीय. अक्षय खन्नाच्या अभिनयाचं सोशल मीडियावरही कौतुक होत आहे. त्याच्या डोळ्यांतले भाव अस्वस्थ करतात आणि हत्येचा जो सीन अक्षयनं केलाय, तो भयभीत करतो. 

Continues below advertisement

 ‘छावा’ : 807.91 कोटी ‘धुरंधर’ : रिलीजच्या 4 दिवसांतच 185.5 कोटी

दोन्हींची मिळून कमाई 993.41 कोटी झाली. वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर पॅकेज कोण? या प्रश्नाचं उत्तर अक्षय खन्नाच हे प्रेक्षकांनीही मान्य केलं.अक्षय खन्नानं खुंखार विलन साकारलेला हा स्पाय-थ्रिलर सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाकेदार कमाई करतोय. 

2. ऋषभ शेट्टी : एका चित्रपटाने देशभर उडवला धुमाकूळ

कन्नड स्टार ऋषभ शेट्टी यांनी 2025 मध्ये एकच चित्रपट दिला. ‘कांतारा: अ लीजेंड चैप्टर 1’. पण एकाच चित्रपटानं सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. या चित्रपटाने 852.16 कोटी कमावत दुसरा क्रमांक पटकावला. दमदार दिग्दर्शन, कणखर अभिनय आणि लोककथांची जादू…ऋषभ शेट्टीनी पुन्हा सिद्ध केलं की कंटेंट असेल तर बाकी सगळं गौण ठरतं.

3. विक्की कौशल: ‘छावा’ने मनं जिंकली, कमाईने 800 कोटी गाठले

विक्की कौशल याची एकमेव रिलीज ‘छावा’ वर्षातील सर्वाधिक हिट चित्रपटांपैकी एक ठरली. या चित्रपटाने 807.91 कोटींचा कलेक्शन करत विक्कीला तिसऱ्या स्थानावर आणलं. मुघल-मराठा इतिहास, भव्य युद्धदृश्ये आणि विक्कीचा दमदार परफॉर्मन्समुळे छावाने बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली.

4. अक्षय कुमार : चार रिलीज, पण कमाईत विक्कीच्या मागे

2025 मध्ये सर्वाधिक चित्रपट रिलीज केले ते अक्षय कुमारने. ‘स्काय फोर्स’, ‘केसरी चॅप्टर 2’, ‘हाऊसफुल 5’ आणि ‘जॉली एलएलबी 3’.चारही चित्रपटांनी मिळून 755.3 कोटींचा आकडा गाठला. अक्षयची सातत्याने काम करत राहण्याची स्टाईल त्याच्या कलेक्शनमध्ये स्पष्ट दिसली, पण एवढे सिनेमे देऊनही तो या वर्षी तो टॉप 3मध्ये पोहोचू शकला नाहीय. 

5. मोहनलाल : तीन चित्रपटांतून 578 कोटींचा मजबूत गल्ला

मलयाळम इंडस्ट्रीचे सुपरस्टार मोहनलालही या यादीत मागे नाहीत. ‘एल 2: एम्पुरान’, ‘थुडारम’ आणि ‘हृदयपूर्वम’ या तिन्ही चित्रपटांनी मिळून 578.45 कोटींची भरभक्कम कमाई केली. त्यांच्या स्टारपॉवरचा प्रभाव प्रेक्षकांनी वर्षभर अनुभवला.