Nagarjuna Was First Choice for Dhurandhars rehman dakait role: 2025 साली प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवून दिला.  5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अजूनही प्रेक्षकवर्गाकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रहमान डकैत ही भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचं विशेष कौतुक होत आहे.  रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जून रामपाल यांच्या देखील पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.  विशेष म्हणजे, अक्षय खन्नाच्या कमबॅकमुळे सिनेसृष्टीत त्याचं कौतुक होत आहे.  दरम्यान, रहमान डकैत या पात्राबाबत मोठी माहिती समोर येत आहे.  रहमान डकैत या पात्रासाठी आधी अक्षय खन्नाची निवड करण्यात आली नव्हती.  तर, साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकाराला विचारणा झाली होती, अशी माहिती समोर येत आहे. 

Continues below advertisement

रहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.  ही भूमिका दुसऱ्या एका अभिनेत्याला ऑफर करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. आता त्या अभिनेत्याचे नाव उघड झाले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन या अभिनेत्याला रहमान डकैतची भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात आले होते, अशी माहिती रिपोर्ट्सनुसार समोर आली आहे.  याची चर्चा होताच चाहत्यांना धक्का बसला.  मात्र, ही बातमी केवळ अफवा असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

Continues below advertisement

अलिकडेच या चित्रपटाबद्दल बोलताना नागार्जुन म्हणाला, "मला हा चित्रपट ऑफर झाल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. मला हा चित्रपट ऑफर झाला नव्हता. धुरंधर हा अद्भुत चित्रपट आहे.   मला हा चित्रपट खूप आवडला.  आदित्य धर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम केले आहे. मी आता धुरंधरच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहे.  धुरंधर टीमला मी खूप शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की, दुसरा भाग देखील ब्लॉकबस्टर होईल", असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, ही बातमी पूर्णपणे खोटी असून,  अफवा असल्याचं स्पष्ट झाले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'लैला मजनू' नंतर इम्तियाज अली पुन्हा एक प्रेमकथा घेऊन सज्ज; 'हीर रांझा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुलुंड मेट्रो दुर्घटनेवरुन सेलिब्रिटींचा संताप; दिया मिर्झा अन् राहुल वैद्यनं सरकारवर ओढले ताशेरे, पोस्ट व्हायरल