Akanksha Puri Topless Photo : देशात सध्या सर्वत्र धुळवडीचा उत्साह दिसून येत आहे. धुळवडीच्या रंगात सगळेच रंगले आहेत. सेलिब्रिटीदेखील धुळवडीच्या रंगात रंगले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी होळी पार्टीत जल्लोष केला. तर, काहींनी आपला मित्रपरिवार, कुटुंबियांसह होळी, धुळवड साजरी केली. अनेकांनी सोशल मीडियावरही फोटो शेअर केलेत. छोट्या पडद्यावर पार्वतीची भूमिका साकारणारी आकांक्षा पुरीवर (Akanksha Puri) नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आकांक्षाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या टॉपलेस फोटोमुळे टीकेचा धुरळा उडाला आहे. 


शेअर केला टॉपलेस फोटो


आकांक्षा पुरी ही छोट्या पडद्यावर पार्वती म्हणून लोकप्रिय आहे. 'विघ्नहर्ता गणेश' या मालिकेत तिने ही भूमिका साकारली होती. त्याशिवाय, 'बिग बॉस ओटीटी हिंदी-सीझन 2' मध्ये ही ती झळकली होती. आकांक्षाने पुरीने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला टॉपलेस फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने गुलाल हो...तो लाल हो...तुमचा आवडीचा रंग कोणता असा प्रश्न तिने चाहत्यांना केला. 


 






आकांक्षाच्या या फोटोवर चाहत्यांनी आपल्या आवडीचा रंग सांगण्याऐवजी नाराजी व्यक्त केली. एका युजरने म्हटले की, किमान आजच्या दिवशी तरी हा फोटो टाळता आला असता. एका युजरने हे काय झाले, तू तर माँ पार्वती आहे असे म्हटले. 






एका युजरने आता तुझे समाधान झाले असेल, तुझ्या या फोटोला मनासारखे लाईक्स आले असतील, असे एकाने म्हटले. तुझे शरीर आहे, त्यावर तुझा अधिकार आहे. पण, किमान आज उत्सवाच्या दिवशी तरी नको असेही या युजरने म्हटले. तर, काही युजर्सने या फोटोशूटमुळे आम्ही तुला अनफॉलो करत असल्याचे म्हटले. 


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून रुपेरी पडद्यावर... 






आकांक्षाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. तिने तामिळ चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याशिवाय ती मल्याळम, कन्नड, हिंदी चित्रपटातही काम केले.  अनेक टीव्ही मालिकांमध्येही ती झळकली आहे. 'बिग बॉस ओटीटी'मध्ये आकांक्षा सहभागी झाली होती. तर मिका सिंगच्या स्वयंवरमध्येही तिने सहभाग घेतला होता. स्वयंवरमध्ये मिकाने तिला त्याची भावी पत्नी म्हणून निवडलं होतं. पण, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.