Ajit Pawar Interview by Avdhoot Gupte : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकत्याच पार पडलेल्या 'झी चित्र गौरव 2024' (Zee Chitra Gaurav Award) या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात अजित पवारांची गायक आणि दिग्दर्शक अवधुत गुप्तेने (Avdhoot Gupte) मुलाखत घेतली. त्यामुळे ऐरवी कलाकरांच्या परफॉर्मन्सने गाजणारा चित्र गौरव सोहळा हा अजित पवारांच्या मुलाखतीमुळे विशेष चर्चेत आला. 


अवधुत गुप्तेने घेतलेल्या या मुलाखतीमध्ये अजित पवारांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची तितकीच राजकीय उत्तरं अजित पवारांनी दिलीत. सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहतायत. त्यातच लोकसभा मतदारसंघातून कोणाच्या पक्षाचा उमेदवार उभा राहणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिली आहे. मागील लोकसभेला पवार कुटुंबात पार्थ पवारांनाही मावळच्या मतदारसंघातून संधी देण्यात आली होती. त्यातच यंदाच्या वर्षात राजकीय घडामोडींनंतर बारामतीतच पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. 


अजित पवारांची भन्नाट उत्तरं


या मुलाखतीमध्ये अजित पवारांना कोणत्या वस्तू कोणाला द्याव्यात यावर चर्चा करण्यात आली. तेव्हा अवधूतने बर्फ दाखवत हा बर्फ तुम्हाला कोणाला पाठवावा वाटतो, ज्यांनी हा डोक्यावर ठेवून शांत बसावं",  यावर बर्फ हा पार्थ पवारांना देईन असं अजित पवारांनी म्हटलं. त्यांच्या या उत्तर सोहळ्यात एकच हशा पिकला. त्यानंतर जेव्हा त्यांना रिमोट कंट्रोलविषयी विचारण्यात आलं की, रिमोट कंट्रोल हा कोणाच्या हातात असावा? तेव्हा तो रिमोट कंट्रोल मी माझ्याच हातात ठेवीन असं अजित पवारांनी म्हटलं. अजित पवारांच्या या राजकीय उत्तरामुळे सध्या राजकीय चर्चांना देखील उधाण आलं आहे. 






अमेय वाघने सादर केली श्रेयससाठी भावनिक कविता


अभिनेता श्रेयस तळपदेला काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामधून सावरत श्रेयसने महेश मांजरेकरांच्या ही अनोखी गाठ या चित्रपटातून कमबॅक केलंय. श्रेयसच्या या कठिण काळात त्याची पत्नी दीप्ती ही त्याच्यासोबत पावलोपावली होती. दरम्यान त्याच्या आयुष्यातील ह्यात प्रसंगावर नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अभिनेता अमेय वाघने कविता सादर केली. 


ही बातमी वाचा : 


Priya Bapat : 'रात जवान हैं', प्रिया बापट पुन्हा एकदा करणार ओटीटीवर धमाका, 'या' कलाकारांसोबत झळकणार नव्या भूमिकेत