Ajinkya Deo Maherchi Saadi: माहेरची साडी (Maherchi Saadi). अलका कुबल (Alka Kubal) अभिनित हा चित्रपट प्रचंड गाजला. या सिनेमाने एक काळ प्रचंड गाजवला. या सिनेमाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या चित्रपटात अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांचीही महत्त्वाची भूमिका होती. या सिनेमात त्यांनी अलका कुबल यांचे बंधू विक्की ही भूमिका साकारली होती. अलीकडेच अजिंक्य देव यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी माहेरची साडी या सिनेमाबाबत अनेक किस्से (Movie) शेअर केले. 

Continues below advertisement

'माहेरची साडी' या सिनेमाबाबत अजिंक्य देव नेमकं काय म्हणाले (Ajinkya Deo Thought Maherchi Saadi)

अलीकडेच अभिनेते अजिंक्य देव, यांनी द मराठी फाउंडरला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से शेअर केले. या मुलाखतीत अजिंक्य देव यांनी, माहेरची साडी या सिनेमाबाबत अनेक किस्से शेअर केले. अजिंक्य देव यांना हा सिनेमा फ्लॉप होईल असं वाटलं होतं. अजिंक्य देव म्हणाले की, ' मी जेव्हा चित्रपट पाहून निघालो, माझी मिसेसही सोबत होती. तेव्हा तिला मी म्हणालो होतो की, माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट आहे'.

'आपल्याला खरंतर ग्रासरूटची कल्पनाच नाही. एखाद्या स्त्रीचा त्रास वगैरे आपल्या याची कल्पना नसते. मला माहेरची साडी बघितल्यानंतर कळलं. Audienceना या या गोष्टी आवडतात. दिग्दर्शक विजूने पहिल्यांदा स्टोरीचे नरेशन दिलं, तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की, इथे बायका रडणार, इथे टाळ्या वाजणार, आणि तसंच घडलं', असं अजिंक्य देव म्हणाले.

Continues below advertisement

 

'जेव्हा थिएटरमधून, बाहेर पडलो, मी माझ्या बायकोला म्हटलं की, अजून एक फ्लॉप सिनेमा माझ्या नावे आहे. तेव्हा माझ्या मागे माझ्यासाठी काम करणारा दिलीप पालव होता. तो खूप रडत होता. मी त्याला म्हटलं की, काय झालं? तो म्हणाला, काय चित्रपट आहे. तेव्हा तिथे मला कळालं, बॉस काय चित्रपट आहे ', असं अजिंक्य देव म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?