Premanand Maharaj: वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या आजारी अवस्थेतील व्हिडिओज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, भक्त वर्गामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशा वेळी अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) पुढे आलाय.त्याने प्रेमानंद महाराजांना आपली किडनी दान करण्याची तयारी दाखवली आहे.
Ajaz Khan: एजाज खानचा भावनिक व्हिडिओ
मंगळवारी एजाज खान यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला. त्यात तो म्हणाला, “प्रेमानंद जी अशी व्यक्ती आहेत ज्यांनी कधीच कोणत्याही धर्माविरुद्ध बोलले नाही, कधीही कुणाला भडकवलं नाही. जर माझी किडनी त्यांच्या शरीराशी जुळली, तर मला त्यांना माझी एक किडनी द्यायची आहे.” त्यांनी आपल्या चाहत्यांनाही आवाहन केलं की सर्वांनी महाराजांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. एजाज पुढे म्हणाला,“मित्रांनो, त्यांच्यासाठी प्रार्थना करा की ते 100 वर्ष जगावेत आणि हिंदुस्तानचं आणि आपलं आणखी भलं करावं. मी नक्कीच त्यांना भेटायला येईन, सर.”
शिल्पा शेट्टीच्या पतीनेही दिली ऑफर
प्रेमानंद महाराज यांना अनेक भाविकांकडून किडनी डोनेशनची ऑफर आली आहे. मात्र, त्यांनी आतापर्यंत त्या नाकारल्या आहेत. यापूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांनीही त्यांना किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, महाराजांनी सर्व ऑफर्स नम्रतेने नाकारल्या होत्या.
महाराजांची तब्येत चिंताजनक
अलीकडेच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रेमानंद महाराजांचे अंग थोडे सूजलेले आणि अशक्त दिसत होते. बोलताना त्यांच्या आवाजात कंप जाणवत होता. त्यांनी स्वतः सांगितलं, “माझ्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. आता मला बरे करण्यासाठी काही उरलेलं नाही. मला जावंच लागेल,आज नाही तर उद्या.”भक्तांमध्ये त्यांच्या आरोग्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
देशभरातील भाविक त्यांना भेटण्यासाठी येऊ लागले
वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज हे बऱ्याच काळापासून किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. काही काळापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये महाराजांचा चेहरा सुजलेला आणि पूर्णपणे लाल झाला होता. या व्हिडिओमुळे त्यांचे अनुयायी चिंतेत पडले होते. जरी हा व्हिडिओ खूप जुना असल्याचे म्हटले जात असले तरी, हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की देशभरातील भाविक त्यांना भेटण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी येऊ लागले. काही काळापूर्वी त्यांची नियमित पदयात्रा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. सुमारे ११ दिवसांच्या थांब्यानंतर, त्यांची पदयात्रा १२ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाली.