Gokul vs milk producers clash over debenture: गोकुळ दूध संघाच्या डिबेंचरवरून संस्थाचालक, दूध उत्पादक शेतकरी विरुद्ध गोकुळ असा संघर्ष सुरू झाला आहे.... दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह जवाब दो मोर्चा काढला. शासकीय विश्रामगृहपासून गोकुळच्या कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. गोकुळ दूध संघाने डीबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत नाही, अशा पद्धतीचा आरोप संस्था चालकांनी केला आहे. भाजप नेत्या आणि गोकुळ संचालिका शौमिका महाडिक या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. मोर्चाचे आयोजन करणाऱ्या शौमिका महाडिक यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन 'गोकुळ' संस्थेच्या विरोधात नसून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे. "जी रक्कम डी-बेंचरपोटी कापून घेण्यात आली आहे, ती तातडीने दूध उत्पादकांना आणि संस्थांना परत मिळावी, अन्यथा दूध बिलाच्या दरात योग्य वाढ करण्यात यावी," अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन 'गोकुळ' प्रशासनाला देण्यात येणार आहे.
गतवर्षी पेक्षा 40 टक्के रक्कम कपात केली असल्याचा आरोप
दरम्यान, गोकुळने प्राथमिक दूध संस्थांना डीबेंचर स्वरूपात याही वर्षी भरघोस रक्कम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, ही घोषणा फसवी असून, या रकमेमध्ये गतवर्षी पेक्षा 40 टक्के रक्कम कपात केली असल्याचा आरोप दूध संस्थांकडून केला जात आहे. याबाबत चार दिवसांपूर्वी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह संस्था प्रतिनिधींनी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांना घेराव घालून विचारणा केली होती. 'गोकुळ'ने फरक बिलातून सुमारे 40 टक्के रक्कम डिबेंचर म्हणून कपात केल्याने दूध संस्था संतप्त झाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या