Buldhana Bhendwal Ghatmandni बुलढाणा :  वर्षभरातील पीकस्थिती, पावसाचे प्रमाण, तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींसह देशाची संरक्षण स्थितीचा अंदाज वर्तविणारी बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध व ऐतिहासिक भेंडवडची घटमांडणी (Bhendwal Ghatmandni) यावर्षी १९ एप्रिल म्हणजेआज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार आहे. या मांडणीद्वारे (Ghatmandni) पावसाचे अंदाज काय येणार? वर्षभराची पीक स्थिती काय असणार? शेतमालाला भाव काय मिळणार? याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.. विदर्भासह राज्यभर प्रसिद्ध असलेल्या या घटमांडणीतून अतिवृष्टी, दुष्काळ, पीकस्थिती, आर्थिक तसेच राजकीय परिस्थिती आणि विविध संकटांबाबत अंदाज वर्तविले जातात. त्यामुळे या मांडणीबाबत शेतकरी वर्गासह राजकीय नेते, आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी उत्सुकता असते.

Continues below advertisement

या गट मांडणीसाठी विदर्भासह खानदेश व मध्य प्रदेशातील शेतकरी हजेरी लावतात. आज सायंकाळी सूर्यास्ता वेळी ही घट मांडणी होणार असून उद्या म्हणजेच वीस तारखेला सूर्योदयावेळी घट मांडणीचे अंदाज वर्तवण्यात येतील ते ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग गर्दी करत असतो. यंदा जागतिक युद्धजन्य परिस्थिती, इंधन तुटवडा, महागाई अशा विविध समस्यांमुळे भेंडवळच्या घटमांडणी व त्यातून वर्तवण्यात येणाऱ्या अंदाजानकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का? (Buldhana Bhendwal Ghatmandni)

Continues below advertisement

घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे. 

त्याच त्या गोष्टी वारंवार फिरवून सांगितल्या जातात- अंधश्रद्धा निर्मूलन समिती

दुसरीकडे, भेंडवळच्या घट मांडणीला अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने विरोध दर्शवला आहे. या अशा प्रकारच्या भाकिते व अंदाजानं कुठलाही शास्त्रीय आधार नसून गेल्या पाच वर्षात या अशा घटमांडणीचे कुठलेही अंदाज खरे ठरले नाहीत. त्याच त्या गोष्टी वारंवार फिरवून सांगितल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा घट मांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी केलेल आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Horoscope Today 19 April 2026 : आज अक्षय्य तृतीयेचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य