Bollywood's Richest Actresses : बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कोट्यवधींचे मानधन घेतात. या अभिनेत्रींच्या संपत्तीबाबत अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींची यादी... 


ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)
रिपोर्टनुसार, प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती ही 100 मिलियन डॉलर एवढी आहे. 


प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री प्रियांका चोप्राचं नाव हे दुसऱ्या क्रमांकावर येतं. तिच्याकडे जवळपास 70 मिलियन डॉलर  एवढी संपत्ती आहे. 


करिना कपूर (Kareena Kapoor)
बॉलिवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर ही  60 मिलियन डॉलर एवढ्या संपत्तीची मालकिण आहे. करिना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांना तिच्या चाहत्यांची विशेष पसंती मिळते. करीना कपूर खान  डान्स इंडिया डान्स: बॅटल ऑफ द चँपियन्स या शोचं परीक्षण करत होती. ती या शोच्या एका एपिसोडसाठी 3 कोटी मानधन घेत होती. 


अनुष्का शर्मा (Anushka Sharma) 
रिपोर्टनुसार, अभिनेत्री अनुष्का शर्माची एकूण संपत्ती ही 46 मिलियन एवढी आहे. लवकरच तिचा  चकदा एक्सप्रेस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती या चित्रपटामध्ये 
क्रिकेटर झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे. 


दीपिका पादूकोण (Deepika Padukone)
बॉलिवूडमधील टॉप-5 श्रीमंत अभिनेत्रींमध्ये दीपिका पदूकोणचं नाव पाचवा क्रमांकावर आहे. तिची एकूण संपत्ती 40 मिलियन डॉलर एवढी आहे. दीपिका पादूकोणचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'द इंटर्न' या आगामी चित्रपटामध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!


Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह