Sai Pallavi Horror Thriller South Movie: आपल्या निखळ अन् सोज्वळ सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ करणारी साऊथची गुणी अभिनेत्री म्हणजे, साई पल्लवी (Sai Pallavi). दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील (Southern Cinema) दमदार आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये साई पल्लवी आघाडीवर आहे. साई पल्लवीनं आजवर अनेक ब्लॉकबस्टर (Blockbuster Movie) आणि सर्वोत्तम चित्रपट (Best Movies) दिले आहेत. अशातच आम्ही तुम्हाला साई पल्लवीच्या कारकीर्दीतील एका थ्रीलर चित्रपटाबाबत (Thriller Movie) सांगणार आहोत, ज्याचा भयानक ट्विस्ट आणि क्लायमॅक्स तुमचं मन भंडावून सोडेल. हा हादरवणारा सिनेमा तुम्हीही OTT वरही पाहू शकता.
साई पल्लवी तिचा साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्यापेक्षा तिच्या अभिनयामुळे जास्त चर्चेत आहे. तिच्या कारकिर्दीत साई पल्लवीनं अनेक उत्तम चित्रपट केले आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या. साई पल्वीनं रोमँटिक ते हॉरर आणि सस्पेन्स थ्रिलरपर्यंत जवळजवळ प्रत्येक शैलीचे चित्रपट केले आहेत आणि तिच्या दमदार अभिनयानं सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. आम्ही साई पल्लवीचा असाच एक चित्रपट तुम्हाला सांगणार आहोत, ज्यानं 7 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाल्यावर खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाचा दुसरा भागही आणावा, अशी मागणी केली होती.
साई पल्लवीच्या या चित्रपटाचं नाव 'दीया' आहे आणि हा चित्रपट एकाच वेळी तमिळ आणि तेलगू दोन्ही भाषांमध्ये चित्रित करण्यात आला होता. तेलुगूमध्ये 'कनम' नावानं रिलीज करण्यात आला. हा एक हॉरर चित्रपट होता, ज्याचं दिग्दर्शन ए.एल. विजय यांनी केलं होतं.
साई पल्लवी 'रामायण' मध्ये व्यस्त
साई पल्लवी आता नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये ती सीता मातेची भूमिका साकारणार आहे. तर, रणबीर कपूर श्रीरामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहे. साई पल्लवी सध्या 'रामायण'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे आणि हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
'दीया' फिल्मची कहाणी काय?
फिल्ममध्ये साई पल्लवीनं तुलसी नावाचं पात्र साकारलंय आणि नागा शौर्य कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. कुटुंबाच्या दबावामुळे दोघांनीही त्यांची मुलगी दिया हिचा गर्भपात केला. त्यानंतर पाच वर्षांनी दोघांनी लग्न केलं. पण, जोपर्यंत कृष्णा तुलसीला पुढे जाण्यास मदत करत नाही तोपर्यंतच, ती तिच्या भूतकाळाशीच झुंजत होती. तुलसी आणि कृष्णाला माहीतही नव्हतं की, त्यांच्यासोबत काय होणार आहे. दीयाचा आत्मा तुलसी आणि कृष्णाला गर्भपात करण्यासाठी भाग पाडणाऱ्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. पण या काळात घडणारे खुलासे आणि ट्विस्ट पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
साई पल्लवीचा 'दिया' चित्रपट इथे पाहा
दरम्यान, साई पल्लवी अभिनीत या चित्रपटात नागा शौर्य, वेरोनिका अरोरा, प्रियदर्शी, आरजे बालाजी, गांधारी नितीन, रेखा आणि सुजिता यांसारखे अनेक कलाकार होते. त्याच्या तमिळ आणि तेलुगू आवृत्त्या OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहता येतील, तर त्याची हिंदी डब केलेली आवृत्ती YouTube वर पाहता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
