Actress Aditi Dravid Shared Engagement Photos: मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आदिती द्रविडनं (Aditi Dravid) चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्री अदिती द्रविडनं साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढी पाडव्याच्या निमित्तानं आपला साखरपुडा आटोपला आहे. अभिनेत्री, गीतकार आणि नृत्यांगना असणाऱ्या अदिती द्रविडनं आपल्या नव्या वर्षाची सुरुवात आयुष्याच्या नव्या प्रवासानं केली आहे. साखरपुड्याचे फोटो अदितीनं इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केले आहेत. अदितीनं फोटो शेअर करताच तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. फारच कमी लोकांना ठाऊन असेल की, मराठी अभिनेत्री अदिती द्रविडचं क्रिकेटर राहुल द्रविडसोबत खास कलेक्शन आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अदिती द्रविडचा साखरपुडा समारंभ थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अदितीचा साखरपुडा कव्हर करणाऱ्या फोटोग्राफर्सच्या टीमकडून फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये अदिती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत एन्गेजमेंट रिंग फ्लॉन्ट करत आहे. अदिती आणि मोहित यांनी आपल्या साखरपुड्यासाठी इंडोवेस्टर्न लूक केला होता. तसेच, या पोस्टमध्ये 'अदिती झाली मोहित' (#AditiZaliMohit) असा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.
मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती द्रविडच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव मोहित लिमये असं आहे. इन्टाग्रामवर प्रोफाईलवर त्यानं अपडेट केलेल्या बायोनुसार तो ट्रॅव्हल कंपनीशी संबंधित काहीतरी काम करत असल्याची माहिती मिळत आहे. साखरपुड्याच्या फोटोंमधील एका फोटोत अदिती आणि मोहितनं पारंपरिक लूक केला आहे. अदितीनं लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली आहे, तर मोहितनं कुर्ता-पायजमा असा लूक केला. एकमेकांच्या हातात हात घालून त्यांनी रोमँटिक फोटोशूट शेअर केलं आहे. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अदिती द्रविडच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या सहकलाकारांनीही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हे खास फोटो रीपोस्ट केले आहेत.
अदिती आणि राहुल द्रविड यांच्यात खास कनेक्शन काय?
अदिती उत्तम अभिनेत्री आहेच, पण त्यासोबतच ती उत्तम गीतकारही आहे. मराठी सिनेसृष्टीत तुफान गाजलेल्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील सर्वांना आवडलेलं 'मंगळागौर' हे गाणं अदितीनं लिहिलं होतं. याशिवाय तिनं मराठी मालिकाविश्वातील अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अदितीची आणखी एक ओळख आहे. क्रिकेटर राहुल द्रविड यांच्याशी तिच्या असलेल्या खास कलेक्शनबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. राहुल द्रविड नात्यानं अदितीचा काका लागतो. स्वतः अदितीनं यासंदर्भात खुलासा केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :