Addinath Kothare : अभिनेता आणि दिग्दर्शिक आदिनाथ कोठारेचा (Addinath Kothare ) 'पाणी' (Paani) हा सिनेमा नुकताच भेटीला आला होता. पाण्यासाठीच्या प्रेमाची ही गोष्ट प्रेक्षकांनाही फारच भावली. त्यामुळे या सिनेमावरही सिनेमागृहात भरभरुन प्रेम करण्यात आलं. त्यानंतर आदिनाथने त्याच्या नव्या सिनेमाची नुकतीच घोषणा केली आहे. 'जय मल्हार...आता बळीराजाचं राज्य यनार...' असं या सिनेमाचं नाव आहे.
पाणी या सिनेमाच्या माध्यमातून आदिनाथने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. आता पुन्हा एकदा आदिनाथने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केल्याने प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. या सिनेमाची गोष्ट आता काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आदिनाथने त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत सिनेमाविषयी माहिती दिली आहे.
आदिनाथने दिली गोड बातमी
आदिनाथने त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर यासंबधी माहिती दिली आहे. 2026 च्या दिवाळीत चित्रपटगृहात अवतरणार “जय मल्हार - आता बळीचं राज्य यनार” !“पाणी” चित्रपटाला, दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्या कलाकृतीला, भरभरून प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार. आज बलीप्रतिपदेच्या शुभ महुर्तावर माझा दिग्दर्शक म्हणून दूसरा प्रवास प्रारंभ करतोय ! तुमचं प्रेम व तुमची साथ कायम असुद्यात!
'पाण्यासारखा गंभीर विषय पडद्यावर मांडायचा होता...'
माझा कट्टावर सिनेमाच्या गोष्टीविषयी सांगताना आदिनाथने म्हटलं की, 'पाण्यासारखा गंभीर विषय मोठ्या पडद्यावर मांडायचा होता. पण त्यामध्ये काहीतरी गोष्ट हवी होती. कारण तो फक्त विषय मांडला असता तर लोकांना ते कंटाळवाणं वाटलं असतं. म्हणून ही गोष्ट निवडली. हनुमंत केंद्रेंचा साखरपुडा झाला होता पण जेव्हा त्यांना कळलं होतं की, या गावामध्ये पाणी नाही तेव्हा त्यांनी हा साखरपुडा मोडला होता. नागदरवाडीत अनेक मुलं बिनलग्नाची होती. लग्न मोडणं ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. पण हनुमंत केंद्रे ही व्यक्तीच वेगळ्या मातीच तयार झालीये. त्यांनी त्या मुलीला जाऊन सांगितलं की,मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे. पण मी तेव्हाच करेन जेव्हा माझ्या गावात पाणी येईल..मी गावात पाणी आणतो तोपर्यंत तुम्ही थांबाला का माझ्यासाठी... त्यानंतर पुढे काय होतं ही गोष्ट आमच्या सिनेमात आहे. आज नागदर वाडीत वर्षभर पाणी असतं आणि हे गाव आजूबाजूच्या 12 गावांना पाणी पुरवतं, असं आदिनाथने सांगितलं.'